पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा

पुणे: वडगाव आनंद (जुन्नर) ३१ ऑगस्टपासून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेले आणे (ता. जुन्नर) येथील तरुण संदीप सुदाम शिंदे (वय ३८) यांचा आज दुर्दैवी अंत झाल्याचे उघडकीस आले आहे. आबाटेक येथील जंगलात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

संदीप शिंदे हे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी दुचाकीवरून टोमॅटोचे पैसे आणण्यासाठी नारायणगाव येथे गेले होते. सायंकाळी ५ च्या सुमारास वडिलांशी फोनवर संभाषण झाल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता. १ सप्टेंबर रोजी आळे-बोरी रस्त्यावरील बोरी बुद्रुक हद्दीतील कालव्याच्या पुलाजवळ त्यांची दुचाकी, चावी, मोबाईल आणि पाकीट जागेवरच आढळल्याने खळबळ उडाली होती. कुटुंबाने कालव्याच्या पात्रात व परिसरात शोधमोहीम राबवली होती, तसेच आळेफाटा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, आज दुपारी १ वाजेच्या सुमारास आबाटेक जंगलात गुरे चरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहणी केली असता, सदर मृतदेह बेपत्ता संदीप शिंदे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संदीप शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, आळेफाटा पोलीस या प्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *