उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू

उत्तराखंड: आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. प्रसंगी आपल्या जीवाची बाजीही लावू शकते, याचाच प्रत्यय घडवणारी घटना उत्तराखंडमधील कोटद्वार येथे घडली आहे. येथे एक आई तिच्या दीड वर्षांच्या मुलीला घेऊन पूर आलेली नदी पार करत होती. यादरम्यान, मध्येच तिच्या हातातून मुलगी निसटली आणि पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागली. आपल्या पोटचा गोळा संकटात असल्याचे समजताच या माऊलीने नदीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने तिचे प्रयत्न वेगवान प्रवाहासमोर अपयशी ठरले आणि मायलेकी या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार २६ वर्षांची जेनम ही तिच्या दीड वर्षांच्या मुलीसह माहेरी गेली होती. तिथून परतत असताना वाटेत असलेली कोल्हू नदी पार करत होती. मात्र नदीचा प्रवाह वेगात होता. यादरम्यान, हातात असलेली मुलगी आफिया तिच्या हातातून निसटली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. मुलगी वाहून जातेय हे पाहताच आफियाने मागचा पुढचा विचार न करता पाण्याच्या प्रवाहात उडी मारली.

त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्नकेले. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की, या दोघींपर्यंत पोहोचणं अवघड झालं. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या. बचाव मोहीम राबवण्यात आली. नदी किनारी दूरपर्यंत शोध घेण्यात आला. अखेरीस या मायलेकीचे मृतदेह नदीच्या पाण्यात सापडले. या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून, मायलेकींच्या दुर्दैवी मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *