मी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा(एनडीएमए) सदस्य राहिलो आहे. त्यामुळे मीनेपाळमधील संकटाकडे या विषयातील तज्ज्ञाच्यादृष्टिकोनातून पाहतो. जेव्हा हिमालयाच्या एखाद्या खोऱ्यातपाणी, चिखल आणि मोठे दगड अचानक खाली येतात,तेव्हा आपला पहिला अंदाज ढगफुटीचाच असतो. हे खरेआहे की, पर्वतीय भागात ढगफुटी ही एक सर्वसामान्यनैसर्गिक घटना आहे. यामुळे विनाशकारी पूर येतो. पणनेपाळच्या पार्श्वभूमीवर, हिमालयाच्या उंचावर नेमकेकाय घडत आहे, हे अधिक काळजीपूर्वक पाहिले पाहिजे. प्रत्येक अचानक येणारा पूर केवळ अतिवृष्टीमुळे येतनाही. कधीकधी त्याचा उगम खूप उंचावर असतो. तिथेबर्फ, खडक, पाणी, तापमान आणि गुरुत्वाकर्षण अशीकाही परिस्थिती निर्माण करतात, जी समजून घ्यायलाआपण अजून शिकत आहोत. फेब्रुवारी 2021 मध्ये उत्तराखंडमधील ऋषिगंगा-तपोवन आपत्तीने हे अत्यंत भयंकर पद्धतीने दाखवून दिले. ती हिवाळ्यातील एक स्वच्छ सकाळ होती. पण खोऱ्यात खूप उंचावर खडक आणि बर्फाचा एक मोठा भाग तुटला. तोवेगाने खाली आला आणि त्याचे एका विनाशकारी ढिगाऱ्याच्या प्रवाहात रूपांतर झाले. या घटनेत 200 हूनअधिक लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले. ऑक्टोबर2023 मध्ये सिक्कीममधील दक्षिण ल्होनाकच्या घटनेतएक वेगळीच प्रक्रिया पाहायला मिळाली. खूप जड ढिगाराहिमनदीच्या सरोवरात (ग्लेशियल लेक) पडला. यामुळेमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि पाणी अडवून ठेवणारानैसर्गिक अडथळा तुटला. यानंतर अत्यंत विनाशकारीवेगाने तिस्ता खोऱ्यात पूर आला. नेपाळची घटना याचाआणखी एक वेगळा प्रकार सांगते. सुरुवातीच्याअहवालांमध्ये भूकंपामुळे हिमनदी फुटण्याची शक्यतावर्तवण्यात आली होती. पण नंतरच्या वैज्ञानिकमूल्यांकनातून असे संकेत मिळाले की, हिमनदीफुटल्यामुळेच कदाचित भूकंपासारख्या हालचाली निर्माणझाल्या असाव्यात. उंच बर्फाळ पर्वतावरून खडक आणिबर्फाचा मोठा भाग तुटून वेगाने खाली पडला. यातून तयारझालेला ढिगारा आणि पाणी नदीच्या प्रवाहात मिसळले. यातीनही घटनांमधून एक महत्त्वाचा धडा मिळतो. खालीसारखाच दिसणारा विध्वंस असू शकतो, पण उंचावरत्याची कारणे अगदी वेगळी असू शकतात. आणखी एक नैसर्गिक घटना आहे, जिच्याबद्दललोकांमध्ये अधिक जागृती होण्याची गरज आहे. तीम्हणजे ‘पर्माफ्रॉस्ट’. ही अशी खडकाळ जमीन असते,जी किमान सलग दोन वर्षे गोठलेलीच असते. खूपउंचावरील भेगांमध्ये असलेला बर्फ पर्वताच्या खडकांनाएकमेकांशी जोडून ठेवण्यास मदत करू शकतो.तापमानातील बदल, वारंवार गोठण्याची आणिवितळण्याची प्रक्रिया, तसेच पर्माफ्रॉस्टची हळूहळू होणारीझीज या नैसर्गिक जोडणीला कमकुवत करू शकते. याचाअर्थ असा नाही की, हिमालयाचे पर्वत आता सगळीकडेतुटून पडणार आहेत. पण हवामान बदलाच्या काळातआपल्याला पर्वतांच्या स्थिरतेचाही गांभीर्याने अभ्यासकरावा लागेल. पाणी आणि ढिगारा खाली जाण्यासाठी सर्वात सोपारस्ता शोधतात. खोरी ही पाणी, बर्फ, दगड आणि गाळयांच्या अमर्याद ऊर्जेला एका मर्यादित मार्गात वळवतात.दुर्दैवाने, मानवी हालचालीही नेमक्या याच ठिकाणीहोतात. नद्यांच्या खोऱ्यालगत रस्ते बांधले जातात. याचनद्यांवरून पूल बांधले जातात. जलविद्युत प्रकल्पही याचखोऱ्यांवर अवलंबून असतात. पिढ्यान््पिढ्या गावेनद्यांच्या काठावरच वसलेली आहेत. भाविक, पर्यटकआणि ट्रेकिंग करणारेही याच मार्गावरून जातात. अशावेळी अनेक किलोमीटर दूर आणि हजारो मीटर उंचीवरसुरू झालेली आपत्ती अचानक या लोकांसाठी धोका बनूशकते. आपत्तीला खालपर्यंत आणू शकणारा हा संपूर्णखालचा प्रवाह (डाउनस्ट्रीम कॉरिडॉर) आपण समजूनघेण्याची गरज आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) प्रत्येक अचानक येणारा पूर केवळअतिवृष्टीमुळे येत नाही. कधी कधीत्याचा उगम खूप उंचावर असतो. तिथेबर्फ, खडक, पाणी, तापमान आणिगुरुत्वाकर्षण अशी काही परिस्थितीनिर्माण करतात, जी समजून घ्यायलाआपण अजून शिकत आहोत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
महाराष्ट्र
- मुंबई: मनसेच्या त्या गुंडांना त्वरित अटक झालीच पाहिजे; भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक आक्रमक, पोलीस कारवाईची मागणी
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
- जालना: उपोषणाचा चौथा दिवस! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मळमळ अन् उलट्यांचा त्रास; वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला





























Subscribe to my channel


