मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अखत्यारीत चालणाऱ्या आणि मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कूपर (Cooper Hospital) आणि सायन (Sion Hospital) या नामांकित रुग्णालयांमध्ये मागील दोन वर्षांपासून एक्स-रे मशिन खरेदीचा प्रश्न प्रलंबित आहे. या दोन्ही प्रमुख रुग्णालयांमध्ये नवीन एक्स-रे यंत्रे उपलब्ध न झाल्यामुळे आपत्कालीन आणि आघात (ट्रमा केअर) उपचारांवर गंभीर विपरीत परिणाम झाला असून, रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांच्या या विलंबाबद्दल लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी लावून धरली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबई महापालिकेने सप्टेंबर २०२४ मध्ये कूपर आणि सायन रुग्णालयांसाठी नवीन एक्स-रे यंत्रे खरेदी करण्यासाठी निविदा (Tender) मागवल्या होत्या. या निविदा प्रक्रियेमध्ये जपानच्या 'कोनिका मिनोला' (Konica Minolta) या प्रसिद्ध फर्मने अंदाजित खर्चापेक्षा सुमारे १९ टक्के कमी दर सादर करत एकमेव प्रतिसाद देणारी कंपनी म्हणून निविदा भरली होती. ही निविदा योग्य त्या स्तरावर व नियमांच्या अधीन राहून मंजूर देखील करण्यात आली होती. मात्र, जेव्हा ही फाईल मंजुरीसाठी संचालक स्तरावर (Director Level - DL) गेली, तेव्हा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी अचानक हा निविदा प्रस्ताव रद्द करण्याचे निर्देश दिले. या एकाच निर्णयामुळे एक्स-रे यंत्र खरेदीची संपूर्ण प्रक्रिया रखडली आणि जवळपास दोन वर्षांचा काळ लोटूनही रुग्णालयांना नवीन मशिन मिळाले नाहीत.
या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत समाजवादी पक्षाचे आमदार आणि नेते रईस शेख यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोन वर्षे यंत्र खरेदी रोखणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, सुमारे तीन कोटी रुपयांच्या या अत्यावश्यक उपकरणांअभावी गरीब रुग्णांना खासगी निदान केंद्रांमध्ये जावे लागत असून, त्यामुळे त्यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेषतः रस्ते अपघात, आघात कक्ष (ट्रमा केअर), बालरोग विभाग, शस्त्रक्रिया गृह (Operation Theatre) तसेच अतिदक्षता विभाग (ICU, NICU आणि SICU) मधील रुग्णांच्या उपचारांसाठी एक्स-रे करणे अत्यंत अनिवार्य असते. मशिन बंद किंवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
दुसरीकडे, भाजपचे आमदार अमित साताम यांनीही २८ ऑगस्ट रोजी महापालिकेला पत्र लिहून कूपर रुग्णालयात मोबाइल आणि स्टेशनरी एक्स-रे यंत्रे तात्काळ बसवण्याची जोरदार मागणी केली होती. कूपर रुग्णालयातील डिजिटल रेडिओग्राफीची सुविधा गेल्या दोन वर्षांपासून कोलमडल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. महापालिकेच्या अनास्थेमुळे मुंबईच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, लवकरात लवकर यावर ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




