नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा: राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनसीआर (NCR) क्षेत्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी एक अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक अत्याचार (Gang-Rape) करण्यात आल्याची अत्यंत धक्कानदायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तत्परता दाखवत बसचा चालक आणि वाहक अशा दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. २०१२ च्या कुख्यात निर्भया प्रकरणाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या या भीषण घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी ही उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असून ती ११ वी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी आहे. अभ्यासाच्या कारणावरून आणि आईच्या ओरडण्यामुळे तिने ३ ऑगस्ट रोजी कोणालाही न सांगता घर सोडले होते. ती उत्तर प्रदेशातून नोएडा सेक्टर-६३ मध्ये राहणाऱ्या तिच्या चुलत भावाला भेटण्यासाठी प्रवास करत होती. प्रवासादरम्यान ४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि अंधार असल्यामुळे ती चुकीने ग्रेटर नोएडाच्या 'परी चौक' (Pari Chowk) येथे बसमधून खाली उतरली.
परी चौक परिसरात ती पावसात अडकली असताना आणि एकटी असताना तिने एका रिकाम्या दिसणाऱ्या स्लाीपर बसला हात दाखवून थांबवले. त्यावेळी बसमध्ये चालक कुलदीप आणि वाहक संदीप उपस्थित होते. पीडित मुलीने त्यांना ती कुठे जात आहे याची माहिती दिली. त्यावर बसच्या वाहकाने (संदीप) तिला त्यांची बस नोएडा सेक्टर-६३ कडेच जात असल्याचे सांगून खोटे बोलून बसमध्ये बसवले. मात्र, बस सुरू झाल्यानंतर चालकाने बस नियोजित मार्गावरून वळवून दिल्लीच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली.
बस धावत असताना वाहकाने आधी मुलीशी असभ्य वर्तन केले आणि त्यानंतर चालक व वाहक दोघांनी मिळून त्या अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये पाशवी अत्याचार केला. मुलीने या कृत्याला तीव्र विरोध केला असता, आरोपींनी तिला जीवे मारण्याची आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. तब्बल ४७ किलोमीटरहून अधिक काळ दिल्ली-एनसीआरच्या विविध भागांतून ती बस फिरवली जात होती. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी दिल्लीतील कश्मीरी गेट (Kashmere Gate) परिसरातील रिंगरोडजवळ त्या मुलीस रस्त्यातच बेवारस सोडले आणि तेथून पसार झाले.
पीडितेने अत्यंत धाडस दाखवत आणि घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी कश्मीरी गेट पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा (POCSO Act) आणि सामूहिक बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिमिरपूर येथील बस पार्किंगमधून मुख्य आरोपी बसचालक कुलदीप आणि वाहक संदीप या दोघांना अटक केली. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली ती स्लीपर बसही जप्त करण्यात आली असून फॉरेन्सिक पथकाकडून त्याची कसून तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे चव्हाट्यावर आला आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



