नवी दिल्ली/मुंबई: देशभरातील नागरिकांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असतानाच, आता हवामानात अचानक मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, देशातील तब्बल १३ राज्यांमध्ये पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, समुद्रातील चक्रीवादळ सदृश परिस्थिती आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा बदल पाहायला मिळत आहे. या काळात अनेक राज्यांमध्ये ताशी ६५ किलोमीटर वेगाने वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्रासह 'या' राज्यांना बसणार पावसाचा फटकाहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पावसाचा प्रामुख्याने जोर असणार आहे.
उत्तर-पश्चिम भारतात पुढील काही दिवसांत हवामानात वेगाने बदल होतील. पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्येही वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत.तर दुसरीकडे, दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या भागांमध्ये पुढील ६ ते ७ दिवस मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल?महाराष्ट्रात मान्सूनचे वारे लवकरच दाखल होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची (Hailstorm) शक्यता व्यक्त करण्यात
आली आहे.
उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहून दुपारनंतर किंवा संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसतील. यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने नागरिकांना विजा चमकत असताना झाडांखाली किंवा पत्र्यांच्या शेडखाली
आश्रय न घेण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: शरद पवार गटाला खिंडार! तीन आजी-माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!





























Subscribe to my channel




