
Wardha : वर्धा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून अवैध वाळूची वाहतूक सुरु होती. याबाबतची माहिती सहायक पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांना मिळाली. यावरून नाकाबंदी करत गिरडकडून जामकडे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ६ ट्रकवर कारवाई करत वाळूची तस्करी रोखली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यासंबंधी १४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल मंत्र्यांकडून वाळू माफियावर अंकुश लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. मात्र अधिकाऱ्यांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधातून वाळूची अवैध वाहतूक सुरुच असल्याचे बोलले जात आहे. अशात वर्धा जिल्ह्यात वाळू उपसा करता येत नसल्याने भंडारा जिल्ह्यातून वाळूची अवैधपणे वाळूची वाहतूक केली जात होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. वर्धा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत आहे. बाहेर जिल्ह्यातून वाळू आणत जिल्ह्यात मोठ्या दरात वाळू विकली जात आहे. ही सर्व वाळू बिना रॉयल्टी असून यात शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियाचे धाबे दणाणले आहे.
|
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरात खळबळ! २० जणांचे टोळके आले, किराणा दुकानात गेले, पुढे घडले ते भयंकर |
दरम्यान पोलिसांना रात्री गस्ती दरम्यान गिरडकडून जामकडे मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी समुद्रपुर येथे सापळा रचून नाकाबंदी केली. यावेळी एका मागे एक ट्रक येतांना दिसले. सदरचे ट्रक थाबंवून विचारपुस केली असता त्यांनी वाहनामध्ये रेती असल्याचे सांगितले. ट्रकची ताडपत्री काढून पाहणी केली असता सर्व वाहनात गौण खनिज तांबडी पांढरी रेती असल्याचे दिसुन आली.
१४ जणांवर गुन्हा दाखल
रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितले. सदर वाळू भंडारा येथुन वाहन मालकाच्या सांगण्यावरून भरून आणल्याचे चालकांकडून सांगण्यात आले. यावेळी पोलिसांनी तब्बल १ करोड ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून शेख रशिद (रा. अमरावती), मनिल धुर्वे (रा. कसाईखेडा अमरावती), जुबेर खान (रा. अमरावती), अतुल भगत (रा. हुसनापुर ता. देवळी, जि. वर्धा, निकेश मेश्राम (रा. कारला चौक, वर्धा), प्रतिम उईके (रा. सेलडोह, ता. सेलु जि. वर्धा), पंकज मडावी (रा. सेलडोह, ता. सेलू जि. वर्धा), बबलू उर्फ ईरशाद पठाण (रा. वर्धा, पसार), शेख नसीब (रा. ताजनगर अमरावती), गौसीन खान (रा. वर्धा पसार), शैलेश शेंद्रे (रा. तिगांव वर्धा), तुषार सोनटक्के (रा. सेलडोह, ता. सेलु जि. वर्धा), अजहर खान (रा. वर्धा), शेख रूबेज (रा. स्टेशनफैल, वर्धा) या १४ जणाविरोधात समुद्रपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहर
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
महाराष्ट्र
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- वर्धा: 'घरकुल योजनेचा' लाभ न मिळाल्याने थेट नगरपरिषदेत नागरिकाने अंगावर ओतून घेतले रॉकेल!
- परभणी: बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच; परभणीत एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही!
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर

























Subscribe to my channel




