सुपर 8 फेरीत इंग्लंडचा एकाच वेळी तीन संघाना धक्का, झालं असं की..Image Credit source: ICC Twitter
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत इंग्लंडने श्रीलंकेला 51 धावांनी पराभूत केलं. खरं तर पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी पाहून श्रीलंका सहज जिंकेल असं वाटत होतं. पण निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला. इंग्लंडने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललं. इंग्लंडने श्रीलंकेसमोर विजयासाठी 146 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना श्रीलंकेला फक्त 95 धावा करता आल्या. या सामन्यात श्रीलंकेचा 51 धावांनी पराभव झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेचा नेट रनरेट कमालीचा घसरला आहे. तर इंग्लंडला जबर फायदा झाला आहे. इंग्लंडचा सुपर 8 फेरीतील उर्वरित दोन सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध आहे. यापैकी एक सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील जागा पक्की होणार आहे. पण इतर संघांचं गणित मात्र बिघडलं आहे.
सुपर 8 फेरीच्या गुणतालिकेत काय झालं?
टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. श्रीलंकेचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना इंग्लंडशी झाला. हा सामना इंग्लंडने जिंकला. या विजयासह गट 2 मधील गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहेत. कारण इंग्लंडने विजय मिळवून सुपर 8 फेरीतील गट 2 गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. यासह श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड यांना मोठा धक्का बसला. इंग्लंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाट सुकर झाल्याचं दिसत आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला उपांत्य फेरीसाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. अन्यथा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये इंग्लंडचा संघ 2 गुण आणि +2.550 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पहिला सामना पावसामुळे झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण विभागून देण्यात आला. तसेच नेट रनरेट हा 0 आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा पहिल्या सामन्यात दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे खात्यात एकही गुण नाही. उलट नेट रनरेट हा -2.550 इतका झाला आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवण्याशिवाय पर्याय नाही. जर श्रीलंकेने दोन पैकी एक सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




