पुणे: शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत, गेल्या नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड सचिन बन्सीलाल घायवळ (वय ४८) याला राजस्थानमधून अटक केली आहे. सचिन हा पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा सख्खा मोठा भाऊ आहे.
काय आहे प्रकरण? गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी कोथरूड भागात झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर सचिन घायवळवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. या कारवाईची चाहूल लागताच तो पुण्यातून पसार झाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने वारंवार आपली ठिकाणे बदलली. सुरुवातीला तो सोलापूरमध्ये काही काळ लपून राहिला आणि त्यानंतर जयपूरमार्गे राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील धिंगपूर गावात जाऊन स्थायिक झाला.
पोलिसांनी कसा लावला माग?सचिन घायवळ हा मूळचा व्यवसायाने शिक्षक असून एका नामांकित शाळेत कार्यरत होता. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी त्याने आपली वेशभूषा बदलली होती आणि दाढी वाढवली होती.
तो अत्यंत सावधगिरी बाळगत होता; त्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहार पूर्णपणे टाळले होते आणि केवळ रोख रकमेचा वापर करत होता. राहण्यासाठी त्याने ६,५०० रुपये मासिक भाड्याचे घर घेतले होते आणि बाहेरचे जेवण टाळून तो मंदिरातील प्रसादावर गुजराण करत होता. तथापि, पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा माग काढला आणि राजस्थानमध्ये सापळा रचून बुधवारी रात्री त्याला ताब्यात घेतले.
अटकेच्या वेळी त्याच्याकडे ३.५० लाख रुपये रोख रक्कम सापडली. गुन्हेगारी इतिहास:सचिन घायवळवर कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यांमध्ये खून, खंडणी, खुनाचे प्रयत्न, अपहरण, जीवे मारण्याची धमकी आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. कोथरूड परिसरातील १० फ्लॅट बळकावल्याचाही त्याच्यावर गंभीर आरोप आहे. सध्या त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्या टोळीतील इतर सदस्यांचा आणि त्याला मदत करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
शहर
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: मी मनोज जरांगेंवर बोलणे का टाळतोय? छगन भुजबळांनी स्वतःच सांगितलं कारण, सरकारलाही खडा सवाल
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान




























Subscribe to my channel




