
Pune : भारतात अमेरिकतील ॲपल कंपनीच्या आयफोन-१७ चे जल्लोषात स्वागत होत आहे. अनेक शहरांमध्ये आयफोनच्या खरेदीसाठी ॲपलच्या दालनांसमोर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईत तर या रांगेत मारामारी होण्याची वेळ आली. अमेरिकी उत्पादनांसाठी अशा प्रकारे लाल गालिचा अंथरला जातो, कोट्यवधी रुपयांची विक्री होते. परंतु ज्या भारतीय आयटी कर्मचाऱ्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आपल्या ज्ञानाचा आणि मेहनतीचा खरा हातभार लावला आहे, त्यांनाच एच-१ बी व्हिसाच्या ट्रम्पकालीन अन्यायी धोरणांमुळे फटका बसत आहे. यावरून फोरम फोर आयटी एम्प्लॉईजने भारत सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली आहे.
भारताचा सर्वांत मोठी निर्यात ही मानवी बुद्धिमत्ता आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातून ही सर्वाधिक आहे. हीच मानवी बुद्धिमता अमेरिकेला अब्जावधी डॉलरचे उत्पन्न मिळवून देते. तरीही अमेरिकेत भारतीय आयटी कर्मचाऱ्यांवर बंधने, नवे शुल्क आणि अस्थिर धोरणे लादली जात आहेत. याचवेळी अमेरिकी कंपन्यांची उत्पादने भारतात निर्बंधाशिवाय, थेट प्रवेश करतात. ही विसंगती संतापजनक आहे, असे आयटी फोरमने म्हटले आहे.
नव्या नियमांनुसार एच-१ बी व्हिसावर १ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ८८ लाख रुपय शुल्क लावण्याचा निर्णय म्हणजे थेट भारतीयांवर आर्थिक गंडांतर आहे. सध्या सुटीसाठी भारतात आलेले किंवा येण्याचे नियोजन करणारे कर्मचारी या निर्णयाने अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना भेटणे किंवा वैद्यकीय कारणांसाठी भारतात येणे हेही त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे आयटी फोरमने स्पष्ट केले आहे.
भारतामध्ये अमेरिकन उत्पादनांना बाजारपेठ खुली करून देताना, भारतीय मानवी संपदेला न्याय मिळेल याची खात्री भारतीय सरकारने करून द्यायला हवी. आपली ताकद म्हणजे प्रतिभा, आणि तीच जर अन्यायकारक धोरणांनी गुदमरली, तर हा देश फक्त आयफोन विकत घेणारा बाजार राहील; जागतिक ज्ञानशक्ती म्हणून ओळखला जाणार नाही, अशी टीका तज्ज्ञांकडून होत आहे.
या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर व कामगार मंत्रालयाने अमेरिकेकडे कठोरपणे बाजू मांडावी. भारतीय आयटी कर्मचाऱ्यांना वाचवणे ही केवळ उद्योगाची नव्हे, तर राष्ट्रीय प्राधान्यक्रमाची बाब असणे आवश्यक आहे, असेही आयटी फोरमने नमूद केले आहे.
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!























Subscribe to my channel




