
आपली लिव्ह-इन-पार्टनर असलेल्या श्रद्धा वालकर हिचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धाच्या मृतदेहाचा ३५ तुकडे करुन ते जंगलामध्ये फेकून दिल्याची घटना सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. दिल्लीमधील या हत्याकाडांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा चौकशीदरम्यान कसा झाला याबद्दलची माहिती दिली आहे. श्रद्धा जिवंत असून ती इन्स्टाग्रामवर सक्रीय आणि बँकेसंदर्भातील बिलंही भरत आहे असं दाखवण्यासाठी आफताबने तिचा फोन वापरला. कोणीही आपल्याला पकडू नये आणि श्रद्धा बेपत्ता असल्याचं समजून नये या हेतूने केलेली याच कृतीमुळे आफताब पोलिसांच्या जाळ्यात आडकला.
श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी पोलीस स्थानकामध्ये त्कार दाखल केल्यानंतर आफताबला २६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात आला. यावेळी त्याने ‘‘ती भांडण करून घरातून निघून गेली, पण कुठे गेली ते मला माहीत नाही’’, असे उत्तर पोलिसांना दिले. दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाड्याच्या घरात रहात होते. श्रद्धा २२ मे रोजी घर सोडून गेल्याचं आफताबने पोलिसांनी सांगितलं. मात्र आफताबने त्यापूर्वीच म्हणजेच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती हे नंतर स्पष्ट झालं. दिल्लीमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांमध्ये आफताबने तिचा खून केला.
आफताबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा केवळ तिचा मोबाईल सोबत घेऊन गेली होती. श्रद्धाने तिचे कपडे आणि इतर सामना सोबत नेलं नाही असा दावाही आफताबने पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान केला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाअंतर्गत मोबाईलचं नेमकं लोकेशन शोधण्यास आणि कॉल डिटेल्सची माहितीचा शोध घेतला. पोलिसांच्या या तपासामध्ये २२ मे ते २६ मे दरम्यान श्रद्धाच्या खात्यावरुन ५४ हजार रुपये आफताबच्या खात्यावर वळवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. एका बँकेच्या अॅपवरुन हे पैसे आफताबच्या खात्यावर वळवण्यात आले होते. हा व्यवहार झाला तेव्हा फोन मेहरोलीमधील छत्तरपूर परिसरात असल्याचंही तपासामध्ये दिसून आलं. या माहितीमुळे पोलिसांना आफताबवरील संक्षय अधिक वाढला. मात्र पुन्हा केलेल्या चौकशीमध्ये आफताबने, “ती २२ मे रोजी घर सोडून गेल्यापासून माझ्या संपर्कात नाही,” असं पोलिसांना सांगितलं.
दरम्यानच्या काळात पोलिसांचा तपास सुरु होता. या महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी आफताबला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. यावेळी आफताबने पोलिसांना माझ्याकडे श्रद्धाचा फोन आणि बँकिंग अॅपचा पासवर्ड असल्याने मी पैसे माझ्या खात्यावर वळवल्याची माहिती दिली. आफताब या पैशांनी श्रद्धाच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डचं बील भरत होता. बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्रद्धाच्या मुंबईतील घरी जाऊन या बिलांसंदर्भातील विचारपूस करु नये म्हणून आफताब हे पैसे श्रद्धाच्या खात्यावरुन स्वत:च्या खात्यांवर वळवत बिलं भरत होता.
आफताब श्रद्धाचं इन्स्ताग्राम अकाऊंट वापरत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तो या खात्यावरुन श्रद्धाच्या मैत्रिणींशी चॅट करायचा. ३१ मे रोजीच्या एका चॅट दरम्यान श्रद्धाच्या मालकीच्या या फोनचं लोकेशन मेहरोली होतं असं तपासात समोर आलं. यानंतर वसईमधील मणिकपूर पोलिसांनी दिल्लीतील पोलिसांना फोन करुन सविस्तर माहिती दिली. या माहितीच्या आधारे शनिवारी आफताबला ताब्यात घेण्यात आलं. यावेळी पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवत जर श्रद्धा २२ मे रोजी घर सोडून गेली तर तिच्या मोबाईलचं लोकेशन मेहरोली कसं दाखवतं होतं? हा प्रश्न पोलिसांनी विचारताच आफताबच्या भावनांचा बांध फुटल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आणि मोबाईल लोकेशनसंदर्भातील प्रश्न विचारताच रडतच आफताबने, ‘Yes, I Have Killed Her’ म्हणत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
शहर
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
महाराष्ट्र
- पवनराजे निंबाळकर हत्याकांड: २० वर्षांच्या कायदेशीर लढाईचा संपूर्ण इतिहास
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
- बुलढाण्यात बापानेच संपवलं मुलीचं आयुष्य! हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; आरोपी पिता आणि मुलाला अटक
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
गुन्हा
- पवनराजे निंबाळकर हत्याकांड: २० वर्षांच्या कायदेशीर लढाईचा संपूर्ण इतिहास
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
- बुलढाण्यात बापानेच संपवलं मुलीचं आयुष्य! हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; आरोपी पिता आणि मुलाला अटक
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
राजकीय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




