मुंबई-नाशिक महामार्गावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका पेढीच्या (अंगडिया) वाहनाला अडवून, वाहन चालकाला आणि त्याच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण करत तब्बल ६१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. विशेष म्हणजे, या दरोड्यामध्ये इतर गुन्हेगारांसोबतच खुद्द पोलीस कर्मचारीच सामील असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण पोलीस दलात आणि व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सुरत आणि मुंबई परिसरातील एका अँगडिया कंपनीत व्हैन चालक म्हणून काम करणारे गोविंद पटेल हे आपल्या जिगरभाई पटेल या साथीदारासोबत ग्वाल्हेर येथून सुमारे १ कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन मुंबईतील मालाड येथील कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. २४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे वाहन मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी गावाच्या हद्दीत आले असता, महामार्गावरील एका हॉटेलजवळ त्यांनी विश्रांती घेतली. तिथून पुढे निघाल्यानंतर काही अंतरावर पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनातील तीन ते चार जणांनी त्यांच्या गाडीची काच ठोठावली आणि गाडी थांबवण्यास भाग पाडले.
चालकाने काच उघडताच आरोपींनी स्वतःची ओळख 'आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत' अशी सांगत धमकावण्यास सुरुवात केली. तुमचे वाहन घेऊन तात्काळ पोलीस चौकीत चला, असे सांगून आरोपींनी चालकाकडून गाडीची चावी जबरदस्तीने ताब्यात घेतली. त्यानंतर चालक गोविंद आणि त्यांचे साथीदार जिगरभाई यांना त्यांच्याच वाहनाच्या मधल्या सीटवर जबरदस्तीने बसवून बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांचे वाहन काही वेळ नाशिकच्या दिशेने नेले आणि नंतर पुन्हा फिरवून मुंबई-नाशिक महामार्गावरील एका बंद पडलेल्या हॉटेलजवळ आणून थांबवले. तिथे पुन्हा एकदा त्यांना बेदम मारहाण करत वाहनात असलेल्या एकूण १ कोटी रुपयांपैकी ६१ लाख ५० हजार रुपये बळकावले आणि उर्वरित रक्कम तसेच कागदपत्रे तिथेच सोडत आरोपी दुसऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून पसार झाले.
याप्रकरणी वाहनचालक गोविंद पटेल यांनी शहापूर पोलीस ठाण्यात येऊन अज्ञात दरोडेखोरांविरोधात सविस्तर फिर्याद दाखल केली. फिर्यादीत आरोपी हे पोलिसांच्या वेशभूषेत आणि काहीजण पोलीस असल्यासारखे भासत असल्याचा उल्लेख होता. गुन्ह्याचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन शहापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, हे दरोडेखोर दुसरेतिसरे कोणी नसून यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी धडक कारवाई करत आतापर्यंत ५ जणांना अटक केली असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel



