
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात टोळीयुद्धाचा भडका उडालेला बघायला मिळत आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात लगावणाऱ्या गुंड सागर मोहळकर याच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुस्तीच्या कार्यक्रमात निलेश घायवळ याच्यावर सागर मोहळकर याने हल्ला केला होता. त्याने निलेश घायवळच्या कानशिलात लगावल्याने तो चर्चेत आला होता. त्याच सागर मोहळकर याच्यावर अज्ञात आरोपींकडून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या सागर मोहळकरची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे जामखेडमध्ये खळबळ उडाली आहे.
जामखेड शहरातील न्युरानी कॉलनी बुधवारी सायंकाळी अक्षरश गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेली. कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने थेट सात राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना घडली. यापैकी चार गोळ्या मोहळकरच्या अंगात घुसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही थरारक घटना घडली. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून न्युरानी कॉलनी काही काळ तणावाखाली होती.
सागर मोहळकर हा नुकताच कारागृहातून बाहेर
सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वी ३०७ सह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी त्याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. मोहळकर हा नशेच्या आहारी गेलेला असून जामखेड परिसरात त्याची दहशत असल्याची चर्चा आहे.
उपचारांसाठी नगरला हलवले
गोळीबारानंतर जामखेड पोलिसांनी तात्काळ मोहळकरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याच्या शरीरात चार गोळ्या अडकल्या असून परिस्थिती चिंताजनक आहे.
हल्लेखोर फरार, पोलिसांकडून शोध सुरु
गोळीबार करणारे हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले आहेत. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे. दवाखान्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या थरारक गोळीबारामुळे जामखेड पुन्हा एकदा हादरले असून गुन्हेगारीच्या प्रश्नावर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याप्रकरणी पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




