कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने काहीशी उसंत घेतली असून, पावसाचा वेग मंदावला आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ अद्याप सुरूच आहे. हवामानातील या बदलामुळे वातावरणात काहीसा उकाडाही जाणवू लागला असून, अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर ओसरल्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी खाली उतरली असून नदीचे पाणी आता पुन्हा मूळ पात्रात परतले आहे.
सिंचन विभागाच्या शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा चांगल्या प्रमाणात जमा झाला आहे. ऐतिहासिक राधानगरी धरणात ७.३२ टीएमसी म्हणजेच सुमारे ८७.५४ टक्के पाणीसाठा झाला असून, धरणक्षेत्रात गेल्या काही तासांत २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय वारणा धरणात २७ टीएमसी (७८.४९ टक्के), दूधगंगा धरणात १२.६३ टीएमसी (४९.७५ टक्के), तुळशी धरणात २.४५ टीएमसी, कासारी धरणात २.४५ टीएमसी, आणि कुंभी धरणात १.८२ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील घटप्रभा, जांबरे, सर्फनाला आणि कोदे ही धरणे पूर्णपणे म्हणजेच शंभर टक्के भरली आहेत. याशिवाय शेजारील अलमट्टी धरण ८६.३८ टक्के, कोयना धरण ६७.३४ टक्के आणि हिप्परगी बॅरेज ४५.८३ टक्के भरल्याची नोंद करण्यात आली आहे.
पावसामुळे झालेले नुकसान:
जरी पावसाचा जोर कमी झाला असला, तरी सततच्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये नुकसानीचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात पावसामुळे जिल्ह्यातील ९ ठिकाणच्या मालमत्तांचे नुकसान झाले असून, यामध्ये अंदाजे ३ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. चालू मान्सून हंगामात आतापर्यंत झालेल्या एकूण अंदाजित नुकसानीचा आकडा १ कोटी ४० लाख ५०० रुपयांवर पोहोचला आहे.
तालुकानिहाय नोंदवला गेलेला पाऊस (मिमी मध्ये):
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेला पाऊस खालीलप्रमाणे आहे:
गगनबावडा: १६.५ मिमीशाहूवाडी: १२.७ मिमी पन्हाळा: ११.३ मिमी मिमीभुदरगड: ५.२ मिमी
आजरा: ४.१ मिमीचंदगड: ४.१ मिमीकरवीर: १.७ मिमी डहिंग्लज: १.५
हातकणंगले: १ मिमी शिरोळ: ०.८ मिमी कागल: ०.६ मिमी राधानगरी: ९.६
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




