पुणे: लग्नासाठी चांगलं स्थळ मिळावं किंवा आईचा आनंद पाहता यावा, या उद्देशाने पुण्यातील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचा मोठा बनाव रचला. मात्र, त्याचा हा उत्साह त्याला चांगलाच महागात पडला असून, नऱ्हे पोलिसांनी त्याच्या या 'खाकी' स्वप्नाचा पर्दाफाश केला आहे.
नेमका प्रकार काय?
सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील ऋषिकेश राजू जाधव (२६) हा तरुण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला पोलीस व्हायचे होते, पण उंची कमी असल्याने त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. दरम्यान, घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी तगादा लावला होता. जर आपण पोलीस आहोत असे सांगितले तर चांगली मुलगी मिळेल, या विचाराने त्याने आपण 'पुणे पोलीस' दलात भरती झाल्याची खोटी बातमी घरी दिली.
स्वतःचेच लावले भव्य फ्लेक्स:
ऋषिकेश एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या सोसायटीत पेढे वाटले आणि चक्क परिसरात स्वतःच्या फोटोसह "पुणे पोलीस पदी निवड" झाल्याचे भव्य फ्लेक्स लावले. त्याने व्हॉट्सॲपवर पोलीस वर्दीतील फोटो स्टेटस म्हणून ठेवले होते. आपल्या भागातील मुलगा पोलीस झाला म्हणून नऱ्हे पोलीस स्टेशनचे अधिकारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले.
पोलिसांनी चौकशी करताच फुटला घाम:
जेव्हा पोलिसांनी त्याच्या नियुक्ती पत्राची आणि कागदपत्रांची विचारपूस केली, तेव्हा ऋषिकेशची बोबडी वळली. त्याने कोणतीही परीक्षा दिली नसल्याचे आणि तो पोलीस नसल्याचे समोर आले. अधिकृत अधिकार नसताना पोलीस असल्याचे भासवणे आणि महाराष्ट्र पोलिसांच्या चिन्हाचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर BNS कलम २०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचा संदेश:
"पोलीस भरती होणे हे मेहनतीचे आणि सन्मानाचे काम आहे. अशा प्रकारे खोट्या प्रसिद्धीसाठी वर्दीचा अपमान करणे गुन्हा आहे," असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. लग्नासाठी केलेला हा खोटा बनाव आता ऋषिकेशला पोलीस कोठडीची हवा खाण्यास कारणीभूत ठरला आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




