Pune : अभ्यासावरून आईने रागावल्यामुळे पुण्यात 20 वर्षीय तरुणीचे टोकाचे पाऊल

Pune : वाघोली परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वीस वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मुलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आई अभ्यासावरून ओरडल्याने मुलीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

नेमकं काय घडलं?
सारा बलराम अंधारे (वय २०, रा. मॅजेस्टिक सोसायटी, भावडी रोड, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. साराने रोज अभ्यास करावा आणि बाहेर जाताना सांगून जावे, असे तिच्या आईचे म्हणणे होते. यावरून तिचा आईसोबत वाद झाला होता. शनिवारी (२८ फेब्रुवारी) आई, बहीण घरी असताना साराने दुपारी पाऊणच्या सुमारास इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. वाघोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.



विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : अभ्यासावरून आईने रागावल्यामुळे पुण्यात 20 वर्षीय तरुणीचे टोकाचे पाऊल

  1. बापू आंबीकर.. पञकार.. पुर‌ंदरwahtsap 9529002334 says:

    🙏सर
    आपणाकडे पुरंदर तालुक्यातील बातम्या पाठविल्या तर चालू शकतील का…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *