
Pune news : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वरची धानवली गावातील आदिवासी पाड्यातील आजारी वृद्ध महिलेला, रस्त्याअभावी खांद्यावर बसवून उपचारासाठी नेण्याची वेळ आली आहे. बनाबाई नथू धानवले यांना जुलाब आणि ऊलट्या जास्त प्रमाणात झाल्याने, त्यांची प्रकृती गंभीर झाली होती परंतु रस्त्याची सोय नसल्यामुळे कोणतेही वाहन घरापर्यंत पोहचू शकत नसल्याने जावयाने या आजीला खांद्यावर घेऊन डोंगरावरचे अवघड चढ-उतार उतरत 5 किलोमीटरची पायपीट करून दवाखान्यात नेले.
बनाबाई यांची तब्येत बिघडल्याने जवळच्याच गावात राहणाऱ्या जावई सुरेश रामचंद्र वाघमारे यांनी सासरी धाव घेत, बनाबाई यांना थेट पाठीवर घेऊन अवघड पायावाट सर करत निघूडघर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखलं केले. भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात धानवली हे गावं वसलेले आहे.
गावातील आदिवासी पाड्याकडे जाणारा रस्ता कच्चा असल्यानं पावसाळ्यात वस्तीत कोणत्याही प्रकारचे वाहन जात नाही. त्यामुळे पक्का रस्ता नसल्यामुळे येथील आजारी, अबाल,वृद्धांना दवाखान्यात नेण्यासाठी अशाच प्रकारे खांद्यावर घेऊन किंवा झोळी करून घेऊन जावे लागत आहे.
रस्त्याबाबत वारंवार लोकप्रतीनीधी आणि शासनास लेखी तसेच तोंडी मागणी करूनही, त्यांच्याकडून नुसतेच आश्वासने मिळतं असल्याची खंत बोलून दाखवून स्थानिकांनी प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे. या गावचे तात्काळ पुनर्वसन व्हावे किंवा या ठिकाणच्या दोनही आदीवासी पाड्यांना जाण्यासाठी कायमचा रस्ता व्हावा, अशी मागणी याठिकाणी राहणाऱ्या आदीवासी बांधवांकडून करण्यात आली आहे.
शहर
- मुंबईतील ताज हॉटेलला बीएमसीचा दणका: रस्ता आणि पदपथ वापरासाठी तब्बल २७ कोटींची नोटीस बजावली"
- नागपूर: एसीबीचा धक्कादायक अहवाल; लाचखोरीत महसूल विभाग अव्वल, पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर
- लोणी काळभोर पोलिसांचा अंमली पदार्थांवर दणका: गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात अटक; धडक कारवाईने खळबळ
- पुणे: पोलिसांची मोठी कारवाई! मोबाइल दुकान मालकाच्या हत्येच्या प्रयत्नातील 'घायवळ गँग'चा प्रवीण गुंड प्रशांत धुमाळ मुंबईतून जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: जिल्हा परिषद निवासी क्रीडा शाळेत चार विद्यार्थ्यांना उंदरांचा चावा; स्वच्छतेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
- मुंबईतील ताज हॉटेलला बीएमसीचा दणका: रस्ता आणि पदपथ वापरासाठी तब्बल २७ कोटींची नोटीस बजावली"
- नागपूर: एसीबीचा धक्कादायक अहवाल; लाचखोरीत महसूल विभाग अव्वल, पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर
- लोणी काळभोर पोलिसांचा अंमली पदार्थांवर दणका: गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात अटक; धडक कारवाईने खळबळ
गुन्हा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
- नागपूरच्या खापरखेड्यात भीषण अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- टाकाऊतून टिकाऊ: बहराइचच्या महिला कैद्यांनी गव्हाच्या पेंढ्यांपासून साधली प्रगती; 'ओडीओपी' योजनेमुळे मिळाली हक्काची कमाई"
- नवी दिल्ली: डोंगरावरून ढकलून ऐतिहासिक तोफा चोरल्या; वारसा सुरक्षेवर गंभीर प्रश्न
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या


























Subscribe to my channel


