पुणे: सिंहगड रस्त्यावरील अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या पु. ल. देशपांडे उद्यानात (जापानी पार्क) झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करून, ती तोडलेली लाकडे टेम्पोमध्ये भरून लपवून वखारीत नेण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खुद्द पुणे महानगरपालिकेचाच (PMC) एक कर्मचारी मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्याने संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक आणि पुणेकरांमधून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना कशी उघडकीस आली?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना २८ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पू. ल. देशपांडे उद्यानाच्या परिसरात घडली. फिर्यादी तन्मय बाबर हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह खडकवासला भागातून महर्षीनगरकडे दुचाकीने जात होते. यादरम्यान त्यांना पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागच्या बाजूला काही जण अंधारात एका टेम्पोमध्ये (क्रमांक MH-45-6574) झाडांची तोडलेली लाकडे भरताना आणि मोठी कत्तल करताना दिसून आले.
या संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांना व प्रवाशांना शंका आली. त्यांनी तत्परता दाखवत त्या टेम्पोचा पाठलाग केला आणि तो थांबवला. चालकाला झाडांच्या लाकडाबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत ही लाकडे एका खाजगी सोसायटीमधून आणल्याची खोटी माहिती देण्यात आली. मात्र, ही लाकडे महापालिकेच्या उद्यानातीलच असल्याची खात्री पटताच टेम्पोमधील व्यक्तींनी समाधानकारक उत्तर देण्यास पूर्णपणे टाळाटाळ केली. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून नागरिकांनी याला थेट चित्रपटातील 'पुष्पा' स्टाईल चोरी असे संबोधले आहे.
महापालिकेचा कर्मचारीच निघाला मुख्य सूत्रधार
या प्रकरणाचा सखोल माग काढला असता, यात कोणतीही बाहेरची व्यक्ती नसून चक्क पुणे महानगरपालिकेचा कर्मचारी विकास आटोळे, तसेच तुकाराम कुंडगीर आणि इतर तीन जण मिळून हा काळाबाजार चालवत असल्याचे उघड झाले. उद्यानाच्या संरक्षणाची आणि देखभालीची जबाबदारी ज्या प्रशासनावर आणि कर्मचाऱ्यांवर आहे, तेच रक्षक भक्षक बनून सरकारी मालमत्तेची आणि उद्यानातील दुर्मिळ झाडांची चोरी करत असल्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.
पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तन्मय बाबर यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून पर्वती पोलीस ठाण्यात महापालिकेचा कर्मचारी विकास आटोळे, तुकाराम कुंडगीर आणि इतर साथीदारांविरुद्ध चोरी करणे, बेकायदेशीर वृक्षतोड करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरील टेम्पो आणि लाकडांचा मुदमाल जप्त केला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि ही लाकडे नेमकी कोणत्या वखारीत किंवा व्यापाऱ्याला विकली जाणार होती, याचा कसून तपास पोलीस आता करत आहेत.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




