
Pune : उरूळी देवाची आणि फुरसुंगी या गावात विविध विकासकामे करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत पाचशे कोटीं रुपयांचा खर्च केले आहेत. आता या दोन्ही गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन केल्याने पुणेकरांच्या कराच्या पैसा वाया गेला आहे.या गावांवर गेल्या पाच वर्षांत सुमारे २५० कोटी रुपये या गावांमध्ये खर्च झाले आहेत. कचरा भूमीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सन २००८ पासून २०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाअंतर्गत समाविष्ट ११ गावांच्या ३९२ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी या दोन्ही गावांत ४२ कोटी रुपयांची तरतूद आहे. या दोन्ही गावांत ३७१ हेक्टर क्षेत्रावर प्रादेशिक नगर नियोजन योजना (टीपी स्कीम) राबविण्याचेही नियोजित आहे. मात्र, या दोन्ही गावांची मिळून नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
उरूळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांची मिळून नगरपरिषद स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागाने काढली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांना विचारात न घेता या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या गावांमध्ये आतापर्यंत केलेल्या खर्चाची माहिती घेतली असता, महापालिकेने गेल्या काही वर्षात पाचशे कोटींहून अधिक खर्च या गावांमध्ये केल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील काही कामे सुरू असून काही प्रस्तावित आहेत. त्यामुळे महापालिकेचा हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
|
Pune : प्राध्यापक भरती नव्याने जाहिरात; १११ जागांवर दोन महिन्यांत भरती? |
उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांचा ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दोन्ही गावात विकासकामे सुरू करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत सुमारे २५० कोटी रुपये या गावांमध्ये खर्च झाले आहेत. तसेच ३९२ कोटी रुपयांच्या सांडपाणी वहन आराखड्यामध्ये या दोन्ही गावांमध्ये सुमारे ४२ कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित असून त्यातील काही खर्चही करण्यात आला आहे.
उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील नागरिकांनी कचरा भूमीमुळे अनेक वर्षे समस्यांना तोंड दिले आहे. कचरा भूमीला विरोध करण्यासाठी नागरिकांनी आंदोलने करून कायदेशीर लढा दिल्याने या गावांमध्ये कचरा टाकणे बंद झाले. या ठिकाणच्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने दोनशे मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रकल्पही सुरू केला. कचरा प्रक्रिया, वृक्ष लागवड अशा विविध कामांसाठी महापालिकेकडून २०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच या गावांतील नागरिकांना २००८ पासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. रस्त्यांचीही कामे करण्यात आली. ही दोन्ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यानंतर आतापर्यंत सुमारे २५० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. दोन्ही गावांमध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रादेशिक नगरनियोजन (टीपी) योजनेच्या कामांसाठी महापालिकेने सातशे कोटींचा निधी उभारणीसाठीचे प्रयत्न सुरू केले होते. तसेच सांडपाणी व्यवस्था आणि पावसाळी गटारांच्या कामांचेही नियोजनही महापालिकेने केले होते.
राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध
उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावांची मिळून नगरपरिषद करण्याच्या निर्णयाला ‘आपले पुणे’ संस्थेचे उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेने या गावांसाठी नगर रचना योजना तयार केली असून जवळपास जमिन मालकांचे १००० कोटी रुपये बेटरमेंट चार्जेस माफ केले आहेत. या दोन गावांमध्ये मालमत्ता कराची थकबाकी २०० कोटी रुपयांची आहे.अकरा गावांच्या विकास आराखड्यातून ही दोन गावे वगळावी लागतील. ही गावे वगळल्या नंतर उर्वरित नऊ गावांचे नियोजन महापालिकेला करावे लागणार असल्याने या निर्णयाला विरोध असल्याचे केसकर यांनी स्पष्ट केले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




