
Nashik Onion Markets Closed: टोमॅटोप्रमाणेच कांद्याचे भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. या निर्णयाविरोधात आजपासून म्हणजेच सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव तसेच नाशिक परिसरातील सर्व कांदा बाजारपेठेतील कांदा खरेदी-विक्री बंद राहणार आहे. व्यापारी संघटनेच्या या निर्णयामुळे समित्यांमध्ये दैनंदिन होणारे ६० ते ७० हजार क्विंटलचे लिलाव थांबतील. याचा फटका मुख्यत्वे महानगरांना बसण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. अशातच कांद्याचे दर नियंत्रणात राहावे, यासाठी केंद्र सरकारने एक्स्पोर्ट ड्युटीत 40 टक्के वाढ केली. त्यामुळे परदेशात जाणारा माल बांग्लादेश सीमा व बंदरात अडकून पडला आहे.
|
|
परिणामी कांद्याची निर्यात बंद पडल्याने दर झपाट्याने खाली येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समितीच्या सर्व घटकांनी बंद पाळावा, असे आवाहन बाजार समितीचे संचालक व उत्पादकांकडून केले जात आहे.
दरम्यान, सरकारच्या निर्णयात स्पष्टता नाही. मालाचा पुरवठा करता येणार नसेल तर खरेदी का करायची, यावर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संघटनेमध्ये नाशिकमध्ये बैठक झाली. या बैठकीत सोमवारपासून सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्याचे निश्चित झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
शहर
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.
महाराष्ट्र
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- रत्नागिरी: मूल होण्यासाठी औषध व विधीचे आमिष दाखवून सव्वा लाखांचे दागिने लंपास.
गुन्हा
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
























Subscribe to my channel



