
Nanded : राजकारण लै बेकार गोष्ट असते असं म्हटलं जातं, असाच काहीसा प्रत्यय नांदेडमधील खळबळजनक घटनेने आला आहे. राजकीय स्वार्था पोटी एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीला कालव्यात फेकून देऊन हत्या केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी सुरुवातीला पित्याला अटक केली होती, त्यानंतर आता मुखेड तालुक्यातील केरूर गावच्या सरपंचाला देखील ताब्यात घेतले आहे. सरपंच होण्याची ईच्छा आरोपी पित्याला होती, पण तीन आपत्य असल्याने आरोपीने जुळ्या असलेल्या दोघांपैकी एका सात वर्षांच्या मुलीची हत्या केली. विशेष म्हणजे विद्यमान सरपंच गणेश शिंदे या आरोपीने हा सल्ला दिल्याचं तपासात समोर आल्याची माहिती आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी पांडुरंग बाबुराव कोंडमंगले (वय 32) हा मुळ मुखेड तालुक्यातील केरूर येथील रहिवासी आहे. त्याला तीन अपत्ये असून त्यापैकी दोघे जुळे आहेत. बाऱ्हाळी नाका येथे त्याची कटिंगची दुकान आहे. आगामी ग्राम पंचायत निवडणुकीत त्याची सरपंच होण्याची इच्छा होती, त्याने तशी तयारी देखील सुरु केली होती, मात्र तीन आपत्य त्याच्यासाठी अडसर ठरत होते. गावातील विद्यमान सरपंच असलेल्या गणेश शिंदे यानेदेखील तीन अपत्य असल्याने तूला निवडणूक लढता येणार नाही असा वारंवार आरोपीस सल्ला दिला. सरपंच हा आरोपी पांडुरंग कोंडमंगले याचा खास मित्र आहे.
|
Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार पुणे व बीडच्या पालकमंत्री; शासन निर्णय जाहीर |
निवडणूक लढता येणार नाही म्हणून...
तीन अपत्य असल्याने आपल्याला निवडणूक लढता येणार नाही हा विचार त्याच्या मनात सुरु होता. सरपंचाच्या मदतीने एका मुलीला दत्तक देण्याचा विचार केला होता, एवढच नाही तर जुळ्या मुलीचा पुण्यात जन्म झाल्याने आरोपीने पुणे येथे महापालिका कार्यालयात जाऊन जन्म प्रमाणपत्रातील पित्याचं नाव बदलण्याच प्रयत्न देखील केला, पण ते शक्य झालं नाही. तेव्हा तीन पैकी एका मुलाची हत्या करण्याचा षडयंत्र पांडुरंग आणि सरपंच गणेश शिंदे याने रचले. त्यानुसार 29 जानेवारी रोजी त्याने आपल्या सात वर्षाच्या प्राची नामक मुलीला गाडीवर बसवून नांदेडला जातं आहे अस पत्नीला सांगितले.
मुलीला कालव्यात फेकले
पुढे त्याने तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील एडपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निजामसागर डॅम्पच्या एका कालव्यात जिवंत फेकून दिले. त्यानंतर तो घरी परतला आणि मुलगी हरवल्याचे सांगितले. दरम्यान मुलीचा मृतदेह केनॉलमध्ये आढळल्यानंतर एडपल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.
मुखेड पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी पित्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला आर्थिक विवंचनेतून हा कृत्य केल्याचे सांगतिले, त्यानंतर सात ते आठ वेगवेगळे जवाब दिले. पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याने सत्य सांगितले. निवडणूकीत तिसरं अपत्य अडसर ठरत असल्याने सात वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी सरपंच गणेश शिंदे याला देखील ताब्यात घेतले आहे. तेलंगना पोलिसांनी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ राजकीय स्वार्था पोटी पित्याने पोटच्या मुलीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel





Earn recurring commissions with each referral—enroll today!