मुंबई: ठाणे परिसरात आज दहीहंडीचा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. सुट्टीचा दिवस आणि दहीहंडीचा तुफान उत्साह यामुळे आज सकाळपासूनच संपूर्ण मुंबई आणि उपनगर 'गोविंदादमय' झाले आहेत. सकाळपासूनच विविध गोविंदा पथकांची लगबग, मंडळांची अंतिम तयारी आणि ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला आहे. गोविंदांच्या थरांना आणि त्यांच्या साहसाला दाद देण्यासाठी मुंबईकर नागरिक मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसह रस्त्यांवर उतरले आहेत.
साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे टार्गेट: गोविंदा पथकांसाठी आजच्या दिवसाची सुरुवात सकाळीच अत्यंत उत्साहात झाली. ठरलेल्या वेळेत सर्व गोविंदा एकत्र येणे, मानवी थरांची उजळणी करणे आणि त्यानंतर विविध भागांत मानाच्या हंड्या फोडण्यासाठी रवाना होणे, अशी त्यांची मोठी धावपळ उडाली आहे. प्रसिद्ध अशा 'साईलीला क्रीडा मंडळा'चे सुमारे ३०० गोविंदा सकाळीच ८ वाजता आपापल्या ठिकाणांहून बाहेर पडून ठाणे, घाटकोपर, विक्रोळी, गोरेगाव यांसारख्या विविध भागांत दहीहंडी फोडण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी आठ थरांची यशस्वी सलामी देणारे हेच जिद्दी पथक यंदा थेट नऊ थरांचे मोठे लक्ष्य ठेवून मैदानात उतरले आहे. "यंदा आम्ही ९ थरांची यशस्वी सलामी देऊ, असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे," असा विश्वास या पथकातील गोविंदांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यात ११ थरांसाठी २१ लाखांची बक्षिसांची लयलूट: मुंबई महानगर प्रदेशामध्ये विशेषतः ठाणे परिसरात सर्वाधिक उंच दहीहंड्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे मुंबईसह आसपासच्या सर्वच प्रमुख शहरांमधून गोविंदा पथकांची ठाण्यात सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ठाणे शहरात एकूण ५४३ हंड्यांचे आयोजन करण्यात आले असून, यात १०३ सार्वजनिक, ४४० खासगी आणि ३४ अत्यंत मानाच्या व मोठ्या दहीहंड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या दहीहंडी उत्सवात ११ थरांच्या विक्रमी मानवी मनोऱ्यासाठी तब्बल २१ लाख रुपयांचे, तर १० थरांसाठी ११ लाखांपर्यंतची विक्रमी पारितोषिके आयोजकांकडून जाहीर करण्यात आली आहेत. या प्रचंड रकमेच्या बक्षिसांमुळे गोविंदा पथकांमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली असून विक्रमी उंचीचे थर रचण्यासाठी गोविंदा पूर्ण जीान लावून प्रयत्न करत आहेत.
सुरक्षा आणि विम्याची विशेष खबरदारी: दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यंदाच्या उत्सवासाठी सुमारे १ लाख ६५ हजारांहून अधिक गोविंदांचा अपघात विमा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत उतरवण्यात आला आहे. यामध्ये एकूण १ हजार ९५० हून अधिक मानाची आणि तरुण गोविंदा पथके सहभागी झाली आहेत. गेल्या वर्षी हा आकडा १ लाख ५५ हजार गोविंदांपर्यंत होता, तर मंडळांची संख्या १ हजार ८५० च्या आसपास होती. दरम्यान, १४ वर्षाखालील बालकांना दहीहंडीच्या थरांमध्ये सहभागी होण्यावर सक्त बंदी घालण्यात आली असून, सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक उपक्रमांची जोड आणि उत्सवाचा उत्साह यामुळे यंदाची दहीहंडी अत्यंत संस्मरणीय ठरत आहे.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




