जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) अधिकृत गणवेश परिधान करून सर्वसामान्य नागरिकांची व संबंधितांची दिशाभूल करणाऱ्या एका २१ वर्षीय तोतया महिलेला रेल्वे सुरक्षा दलाने 'ऑपरेशन सतर्क' अंतर्गत धाडसी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, विवाहाच्या उद्देशाने आणि स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी हा बनाव रचण्यात आल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलातर्फे जळगाव रेल्वे स्थानकावर दक्षता व सुरक्षा तपासणी (Operation Satark) मोहीम राबवली जात होती. यादरम्यान जळगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर आरपीएफचा गणवेश परिधान केलेली एक तरुण महिला संशयास्पदरीत्या फिरताना आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. तिच्या गणवेशावरील नेमप्लेटवर 'मनिषा कविता युवराज गोपाल' असे नाव लिहिलेले होते. तिच्या संशयास्पद हालचालींमुळे सतर्क झालेल्या जवानांनी तात्काळ तिच्याकडे अधिकृत ओळखपत्र आणि नियुक्तीबाबत विचारणा केली. मात्र, ती कोणतेही वैध किंवा अधिकृत ओळखपत्र सादर करू शकली नाही.
चौकशी दरम्यान या तरुणीने आपण आरपीएफमध्ये कार्यरत असून आपली नियुक्ती नाशिक येथे असल्याचा दावा केला होता. परंतु, जळगाव आरपीएफने तातडीने नाशिक येथील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या दाव्याची पडताळणी केली असता, संबंधित नावाच्या किंवा चेहऱ्याची कोणतीही महिला नाशिकमध्ये आरपीएफ दलात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपले खरे नाव मनिषा युवराज गोपाल (वय अंदाजे २१ वर्षे, रा. कापूसवाडी, जामनेर, जि. जळगाव) असल्याचे सांगितले.
तपासात पुढे अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली; विवाहाच्या उद्देशाने लोकांना प्रभावित करण्यासाठी आणि स्वतःची बडेजाव निर्माण करण्यासाठी या तरुणीने यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश परिधान करून स्वतःचे फोटो काढले होते. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी थेट आरपीएफचा गणवेश घालून ती जळगाव रेल्वे स्थानकात पोहोचली होती. एवढेच नव्हे तर तिच्याकडून बनावट चारित्र्य प्रमाणपत्र आणि पोलीस पडताळणीची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. आरपीएफने या महिलेविरुद्धची प्राथमिक कागदपत्रे व कायदेशीर बाمबी पूर्ण करून तिला लोहमार्ग पोलीस (GRP) जळगाव यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सुपूर्द केले. जीआरपी जळगावने याप्रकरणी संबंधित तोतया महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, या बनावटगिरीमागे इतर कोणाचा सहभाग आहे का आणि या गणवेशाचा वापर करून कोणाची फसवणूक केली गेली आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




