कराड: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सुपने येथे शेतात पाणी भरत असलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेतकरी विजयसिंह आकाराम पाटील (वय ४३) हे जखमी झाले असून, सुदैवाने त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि आरडाओरड ऐकून मदतीला धावलेल्या शेजाऱ्यांमुळे त्यांचा मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकी घटना काय? गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विजयसिंह पाटील हे आपल्या दुचाकीवरून तांब शिवारातील स्वतःच्या शेतात गेले होते. शेतातील कृषी पंप सुरू करून ते पिकाला पाणी देत असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठीमागून त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने पाटील काही क्षण गोंधळले, मात्र त्यांनी घाबरून न जाता हिमतीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
मोठा अनर्थ टळला: पाटील यांचा आरडाओरडा ऐकताच परिसरातील इतर शेतकरी तातडीने मदतीला धावले. लोकांची गर्दी पाहून आणि आरडाओरड ऐकून बिबट्याने पाटील यांना सोडून उसाच्या शेतात धूम ठोकली. या घटनेत पाटील यांच्या अंगावर बिबट्याच्या नखांमुळे किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना त्वरित स्थानिक रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार देण्यात आले.
परिसरात घबराट: सुपने आणि तांब परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याला लपण्यासाठी हक्काची जागा मिळत आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आता तर दिवसाढवळ्या शेतात काम करणेही कठीण झाले असून, शेतीची कामे खोळंबली आहेत. वन विभागाने या परिसराची पाहणी करून तातडीने पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी संतप्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




