पुणे: शहराच्या स्वारगेट ते कात्रज दरम्यान सुरू असलेल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या (Underground Metro Project) कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या मेट्रो कामामुळे कात्रज चौकात आणि परिसरामध्ये होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून (१७ ऑक्टोबर) कात्रज चौकात सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी नागरिकांना व वाहनचालकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जड वाहनांसाठी प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्गांची रचना
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रेलर, कंटेनर आणि इतर अवजड वाहनांनी कात्रज चौकातून जाणे टाळून खालीलप्रमाणे पर्यायी मार्गांचा वापर करावा:
-
पुणे-सातारा महामार्गावरून येणारी वाहने: जुन्या कात्रज बोगद्यामार्गे शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना 'शिंदेवाडी'पासूनच पुढे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच सातारा रस्त्यावरून नवीन बोगदामार्गे कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना 'नवले पूल' येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
-
मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्ग: बाह्यवळण मार्गावरील वारजे भागातून कात्रजकडे येणाऱ्या जड वाहनांना 'नवले पूल' येथेच रोखण्यात येईल.
-
सोलापूर व हडपसरकडून येणारी वाहने: सोलापूरकडून हडपसर, मंतरवाडी आणि कात्रज-कोंढवा रस्त्याने कात्रजकडे येणाऱ्या जड वाहनांना 'मंतरवाडी चौकाच्या पुढे' प्रवेश बंद करण्यात आला आहे.
-
बोपदेव घाटमार्गे येणारी वाहने: बोपदेव घाटमार्गे कात्रज-कोंढवा रस्त्याने कात्रजच्या दिशेने येणाऱ्या सर्व जड वाहनांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
-
शहरातून जाणारी वाहने: मार्केट यार्ड, गंगाधाम आणि बिबवेवाडीमार्गे कात्रज चौकाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना तसेच स्वारगेटकडून कात्रज चौकात जाणाऱ्या जड वाहनांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.
मेट्रोचे काम सुरक्षितपणे आणि वेळेत पूर्ण व्हावे तसेच नागरिकांचा प्रवास विनासायास व्हावा, यासाठी हे तात्पुरते वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




