ओपनर इशान किशन याने केलेल्या तोडफोड खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियासाठी एकूण 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. तर 2 प्रमुख फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी चिवट बॉलिंग करत भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. मात्र तरीही टीम इंडियाने इतिहास घडवला.टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील 175 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने याआधी 2022 साली पाकिस्तान विरुद्ध 6 विकेट्स गमावून 160 धावा केल्या होत्या. अशात आता टीम इंडिया 175 धावांचा यशस्वी बचाव करुन सलग तिसरा विजय मिळवणार की पाकिस्तान विजयासह सुपर 8 मध्ये पोहचणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. अभिषेक शर्मा पुन्हा झिरोवर आऊट झाला. अभिषेकची या स्पर्धेत झिरोवर आऊट होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली.
इशानचा तडाखा
अवघ्या 1 धावेवर विकेट गमावल्यानंतर इशान किशन याने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी धमाका केला. इशानने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीची हवा काढली. इशानने पाहता पाहता अर्धशतक झळकावलं. इशानने अर्धशतकानंतर फटकेबाजी करत धावांचा वेग कायम ठेवला. मात्र सॅम अय्युब याने इशानला आऊट केलं. इशानने सर्वाधिक 77 धावा केल्या.
त्यानंतर तिलक वर्मा, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या तिघांनी किल्ला लढवला. या तिघांनी झुंज दिली. मात्र या तिघांपैकी एकालाही फटकेबाजी करुन पाकिस्तानच्या गोलंदाजांवर कुरघोडी करता आली नाही. हार्दिक पंड्या याला भोपळाही फोडता आला नाही. तिलकने 25 आणि शिवमने 27 धावा केल्या. तर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 32 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी रिंकु सिंह याने 4 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्ससह निर्णायक आणि नाबाद 11 धावा जोडल्या. रिंकूने केलेल्या या निर्णायक खेळीमुळे भारताला पाकिस्तानन विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत मोठी धावसंख्या उभारता आली.
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील सर्वोच्च धावसंख्या
टीम इंडिया, 175 धावा, 2026
टीम इंडिया, 160 धावा, 2022
पाकिस्तान, 159 धावा, 2022
टीम इंडिया, 157 धावा, 2007
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




