जोधपुरमधील कांकाणी काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान आणि इतर कलाकार दोषी आढळलेले आहेत. या प्रकरणी उद्या (16 फेब्रुवारी) राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. यात सलमान खानच्या भूमिकेबाबत निकाल येण्याची शक्यता आहे. जोधपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात सलमान खानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरूद्ध सलमान खानने उच्च न्यायालयात अपील केलेले आहे. सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात सलमान खान आणि इतर संबंधित कलाकारांच्या बाबतीतील प्रकरणाची सुनावणी एकत्र व्हावी यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानुसार आता उद्या याबाबत सुनावणी पार पडणार आहे.
राज्य सरकारचे निर्णयाला आव्हान
काळवीट शिकार प्रकरणात सह-आरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि स्थानिक रहिवासी दुष्यंत सिंग यांना ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्त केले होते. मात्र राज्य सरकारने या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे आता या कलाकरांच्या संबंधित प्रकरणावरही सुणावणी पार पडणार आहे.
सर्व अपिलांची एकत्रित सुनावणी
5 एप्रिल 2018 रोजी सलमान खानला या प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि इतर सह आरोपी सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. सलमान खानने या शिक्षेविरुद्ध जिल्हा आणि सत्र न्यायालयात अपील केले होते, त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मात्र त्यानंतर राज्य सरकारने सहआरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरुद्ध राजस्थान उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी परवानगी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सलमान खानच्या पाच वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणारे अपील देखील उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले होते.
त्यानंतर 15 ऑक्टोबर 1998 रोजी लुणी पोलिस ठाण्यात सलमान खानविरुद्ध दाखल केलेल्या शस्त्रास्त्र कायद्याच्या खटल्यातील अपील देखील 21 मार्च 2022 रोजी उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले होते. त्यामुळे आता जर उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अपीलाची दखल घेतली तर पूर्वी निर्दोष मुक्त झालेल्या सहआरोपींची अडचण वाढण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या या सुनावणीत सलमान खान आणि इतर आरोपींची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?
1998 मध्ये जोधपूरच्या जवळ’हम साथ साथ हैं’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी सलमान खान, सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि इतरांनी काळवीटांची शिकार केली होती. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण अजूनही कोर्टात सुरू आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




