नाशिक जिल्ह्यातून अंधश्रद्धेचा फायदा घेत नागरिकांची फसवणूक केल्याची एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. अघोरी पूजा आणि मंत्र-तंत्राच्या जोरावर घरात ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे तसेच १ लाखाचे तब्बल १० पट किंवा १५ कोटी रुपयांपर्यंतचा भरगोस परतावा मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवून एका निवृत्त महापालिका कर्मचाऱ्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना तब्बल १० लाख ९५ हजार रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित भोंदूबाबासह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.
भोंदूबाबा गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी: मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पिंपळे खुर्द (ता. कळवण, जि. नाशिक) येथील तथाकथित भोंदूबाबा हिराचंद शिवाजी बर्डे ऊर्फ राजूब बाबा याने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने मुंबई येथील काही नागरिकांना आणि एका ६५ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढले. भोंदूबाबाने त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत गुप्त धनाची पूजा करण्याचे नाटक रचले होते. सुरुवातीला एका छोट्या प्रयोगादरम्यान त्याने चलाखीने काही रोकड गायब व प्रकट करून दाखवल्यामुळे संशयित व फिर्यादीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला.
विश्वास संपादन केल्यानंतर, मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पाडण्याच्या विशेष विधीसाठी आणि १५ कोटी रुपयांच्या परताव्याचे स्वप्न दाखवून या भोंदूबाबाने एप्रिल महिन्यात विविध टप्प्यांतून रोख आणि ऑनलाईन माध्यमातून एकूण १० लाख ९५ हजार रुपये उकळले. त्यानंतर आरोपींनी एका गोणीत किंवा पोत्यामध्ये नारंगी कापडात गुंडाळून ३ कोटी रुपये असल्याचे भासवून ती गोणी फिर्यादीकडे दिली आणि सलग सात दिवस घरी त्याची पूजा करण्यास सांगितले. मात्र, घरात शोकांतिका घडल्यामुळे विधी पार पडला नाही, तेव्हा भोंदूबाबाने विधी अशुद्ध झाल्याचे कारण सांगून पुन्हा पैशांची मागणी केली.
गोणीत निघाल्या कागदाच्या रद्दी नोटा: फिर्यादीला संशय आल्याने त्यांनी जेव्हा ती गोणी उघडून पाहिली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या गोणीत वरच्या बाजूला एक ५०० रुपयाची खरी नोट ठेवून खाली फक्त खेळण्यातील व कागदाच्या रद्दी नोटा भरल्याचे उघडकीस आले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अभोणा पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी याप्रकरणी कठोर पावले उचलत मुख्य आरोपी हिराचंद बर्डे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र मानवी बळी व इतर अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम, २०१३ (जादूटोणाविरोधी कायदा) तसेच फसवणुकीच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची कशी फसवणूक सुरू आहे, याचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




