पुणे: जुन्नर शहरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि पालकांच्या अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. जुन्नर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात स्ट्रोलरमध्ये (पालखीगाडीत) शांत झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्या बालकावर एका मोकाट भटक्या कुत्र्याने अचानक जीवघेणा हल्ला चढवला. या भयंकर हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला असून, कुत्र्याने त्याच्या हाताचे बोट फ्रॅक्चर केल्याची अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी प्रकारामुळे जुन्नर शहर व परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नवीन सुनील खराडे (वय ६ महिने) असे या गंभीर जखमी झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जुन्नर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात काही कामानिमित्त आलेल्या कुटुंबीयांसोबत हा चिमुकला आला होता. बाळ थकल्यामुळे त्याला एका स्ट्रोलरमध्ये (गाडीत) झोपवण्यात आले होते. कार्यालयीन काम सुरू असताना अचानक तिथे आलेल्या एका उपटसुंभ आणि आक्रमक भटक्या कुत्र्याने स्ट्रोलरमध्ये झोपलेल्या त्या सहा महिन्यांच्या निष्पाप बालकाला लक्ष्य केले.
कुत्र्याने अत्यंत निर्दयीपणे बालकावर झडप घालून त्याच्या हातावर व बोटांवर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बाळ मोठ्याने रडू लागले आणि कार्यालयात एकच तारांबळ उडाली. उपस्थितांनी तातडीने धाव घेत त्या कुत्र्याला हाकलून लावले, परंतु तोपर्यंत कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचे बोट गंभीर रितीने दुखावले गेले व फ्रॅक्चर झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या लहानग्याला तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल नागरिकांचा तीव्र संताप
या भीषण घटनेमुळे जुन्नर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नगरपरिषद व स्थानिक प्रशासनाविराधात प्रचंड रोष उसळला आहे. शहरात आणि शासकीय कार्यालयीन परिसरांमध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची दहशत व संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक घराबाहेर पडणे सुद्धा मुश्कील झाले असून, यापूर्वीही अनेकदा कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. तहसील कार्यालयासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या सरकारी ठिकाणी जर अशी भयानक परिस्थिती निर्माण होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आणि संबंधित विभागाने तातडीने कडक पावले उचलून या वाढत्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी संतप्त नागरिकांकडून व पालकांकडून केली जात आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



