EPFO Pension Hike: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ९००० होणार? वाचा सविस्तर

image

जेव्हा कर्मचारी पीएफमध्ये पैसे जमा करते तेव्हा नियोक्त्याच्या योगदानातील ८.३ टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाते. सरकार यावर १५ हजार रुपयांपर्यंतच्या पगारावर १.१६ टक्के परतावादेखील देतात. यामध्ये कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळते.

सध्या ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची रक्कम पगारावर आणि सेवेच्या वर्षांवर निश्चित केली जाते. किमान पेन्शन ही १००० रुपये आहे. आता ही पेन्शन वाढवण्याची मागणी केली जात आहे. ७,५०० रुपयांची पेन्शन फक्त १५,००० रुपये पगार मर्यादा आणि ३५ वर्षे सर्व्हिस केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होते. दरम्यान, काही पेन्शनधारकांना त्यांच्या कामाच्या वर्षानुसार जास्त पेन्शन मिळते. त्यांना ९००० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *