धुळे: धुळे जिल्ह्यातून नात्याला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपले लग्न लावून देण्यास आईच अडथळा ठरत असल्याच्या संशयातून एका नराधम मुलाने आपल्या वृद्ध जन्मदात्या आईला जिवंत पेटवून देऊन तिची निर्घृण हत्या केली. ही हृदयद्रावक घटना धुळे तालुक्यातील महिंदळे शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
लग्नाला विरोध केल्याचा संशय आणि अमानुष कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजाबाई भटू खैरनार (वय ६५ वर्षे) असे मृत वृद्ध मातेचे नाव आहे, तर प्रदीप ऊर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (वय ४५ वर्षे, रा. महिंदळे, धुळे) असे अटक करण्यात आलेल्या नराधम मुलाचे नाव आहे. आरोपी प्रदीप हा रिक्षाचालक असून त्याचे वय ४५ वर्षे झाले तरी अद्याप लग्न झाले नव्हते. आपली आईच आपले लग्न लावून देत नाही आणि विवाहात बाधा निर्माण करत आहे, असा संशय प्रदीपच्या मनात बळावला होता. यावरून त्याच्या मनात आईबद्दल तीव्र संताप होता.
मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत वाद
घटनेच्या रात्री जिजाबाई या आपल्या मुलाची वाट पाहत घराच्या अंगणात बसल्या होत्या. मध्यरात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास प्रदीप दारूच्या नशेत धुंद होऊन घरी आला. त्याने घरात येताच माझा विवाह का लावून देत नाहीस? असा जाब विचारत आईसोबत जोरदार भांडण सुरू केले. वाद विकोपाला गेल्यानंतर, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रदीपने आईच्या अंगावर घरात असलेले ज्वलनशील द्रव्य (पदार्थ) ओतले आणि तिला थेट पेटवून दिले.
अपघाताचा आणि आत्महत्येचा खोटा बनाव
आईला जिवंत पेटवल्यानंतर ती गंभीररीत्या भाजली गेली. त्यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आरोपी प्रदीपने अत्यंत हुशारीने एक बनाव रचला. त्याने गंभीर भाजलेल्या आईला आपल्याच रिक्षात बसवले आणि शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात नेल्यानंतर आईने स्वतःहूनच पेटवून घेतल्याचा खोटा दावा त्याने डॉक्टर आणि पोलिसांसमोर केला. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमांमुळे जिजाबाई खैरनार यांचा मृत्यू झाला.
पोलिस तपासात पाप उघड, आरोपी गजाआड
घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. संशयास्पद वाटल्यावरून पोलिसांनी आरोपी मुलगा प्रदीप खैरनार याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच प्रदीप कोलमडला आणि दारूच्या नशेत लग्न ठरत नसल्याच्या रागातून आईला जिवंत जाळल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली. पोलिसांनी नराधम मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या अमानुष घटनेमुळे महिंदळे गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




