पुणे: बेट भागातील गुन्हेगारी, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा; पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी टँकर प्रक्रिया तातडीने सुरू करा. दिलीप वळसे पाटील
बेट भागातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, पानटपऱ्यांवर विकले जाणारे नशीले पदार्थ, विद्युत रोहित्र चोरी तसेच तालुक्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिले. शिरूर पंचायत समिती येथे आयोजित तालुका समन्वय समिती व मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ता योजना समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बेट भागात दारू, जुगार, मटका तसेच पानटपऱ्यांवर विकल्या जाणाऱ्या नशिले पान व इतर मादक पदार्थांच्या विक्रीवर तातडीने कारवाई करून हे प्रकार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश त्यांनी शिरूर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना दिले. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या वीजेचे आकडे टाकून वीज वापर होत असल्याने वारंवार विद्युत रोहित्र जळत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश वळसे पाटील यांनी दिले. तसेच तालुक्यात वाढलेल्या विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांचा गांभीर्याने तपास करून संबंधित चोरट्यांना गजाआड करण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.
दरम्यान, तालुक्यातील अनेक भागांमध्ये नदीपात्रे कोरडी पडल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत) व तहसीलदार यांनी तातडीने पाणीटंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून टँकर मंजुरीची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश दिले. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस आमदार माऊली कटके, माजी आमदार पोपटराव गावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार शिरूरबाळासाहेब म्हस्के,गटविकास अधिकारी महेश डोके, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अमोल भोसले, मुख्याधिकारी नगर परिषद, तालुका कृषी अधिकारी, शिरूर पोलीस निरीक्षक विनोद पाटील (शिरूर), रांजणगाव व शिक्रापूर पोलीस ठाण्यांचे अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी, उपकार्यकारी अभियंता महावितरण शिरूर व शिक्रापूर, कार्यकारी अभियंता महावितरण केडगाव, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती शिरूर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, घोड पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पाबळ, न्हावरा, शिक्रापूर, शिरूर व मलठण ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, दुय्यम निबंधक, सहायक निबंधक, डींभे धरण उपविभागाचे अधिकारी, नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून कायदा-सुव्यवस्था, पाणीटंचाई, वीजपुरवठा, शेती व विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय व सूचना देण्यात आल्या.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




