Chandrashekhar Bawankule : पाचही जागा आम्हीच जिंकणार; मतदानाचा हक्क बजावत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी ग्रामपंचायत येथे आपला मतदानाचा हक्क  बजावला आहे. बावनकुळेंनी सकाळी आपल्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय. तसेच महायुतीचे उमेदवार 51% च्यावर मत घेऊन निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्या संकल्पासाठी आज मतदान होत आहे. मी आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या टप्प्यातील आमच्या पाचही जागा आम्ही जिंकणार आहोत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळेयांनी केला आहे.

Pune News : मोठी बातमी! डी.एस. कुलकर्णी यांच्या पुण्यातील कार्यालयावर ईडीची छापेमारी; अधिकाऱ्यांकडून झाडझडती

पूर्व विदर्भातील पाचही जागा 51% च्यावर मत घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. मोदींना साथ देण्याकरता जनता ही उत्साही आहे. मला वाटतं की मतदारांनी प्रचंड मतदान करावं. मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी, ही देशाची निवडणूक आहे. देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे, असंही बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *