पंढरपूर: खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातून कारागृहाबाहेर सुटल्यानंतर कायद्याची भीती न बाळगता जल्लोष करणे २० जणांना चांगलेच महागात पडले आहे. पुण्यातील एका खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून बाहेर आलेल्या लखन उर्फ पिंटू ढावरे याच्या स्वागतासाठी पंढरपुरात बेकायदेशीर मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
नेमकी घटना काय?
लखन उर्फ पिंटू ढावरे हा २०१७ मध्ये पुणे येथे झालेल्या एका खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. या गुन्ह्याप्रकरणी तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहातून सुटका झाल्यानंतर तो पंढरपुरात दाखल झाला. त्याच्या समर्थकांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून त्याची रॅली आणि मिरवणूक काढली.
धोकादायक जल्लोष आणि दहशत:
या मिरवणुकीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये केवळ फटाक्यांची आतिषबाजीच करण्यात आली नाही, तर अत्यंत धक्कादायक पद्धतीने फटाक्यांची पेटती माळ डोक्यावरून फिरवण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि सर्वसामान्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. 'विसरला का माझी ताकद' अशा आशयाचे मेसेज देऊन गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
पोलीस कारवाई:
या बेकायदेशीर प्रकाराची गंभीर दखल घेत पंढरपूर पोलिसांनी सार्वजनिक शांततेचा भंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणे या कलमान्वये लखन ढावरे आणि त्याच्या इतर १९ साथीदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस हवालदार सचिन हेंबाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: परिसीमन विधेयकात काहीतरी चांगले असेल तर...एनडीएत सामील होण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य!
महाराष्ट्र
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
गुन्हा
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!

























Subscribe to my channel




