मुंबई: वसई-विरार परिसरामध्ये खैर तस्करांनी पुन्हा एकदा आपले डोके वर काढले असून, अत्यंत चलाखीने भाजीपाल्याची वाहतूक करत असल्याचे भासवून बहुमूल्य अशा खैराच्या लाकडांची अवैध तस्करी करण्याचा एक धक्कादायक प्रकार वन विभागाच्या पथकाने उघडकीस आणला आहे. भाताणे वनक्षेत्रातील सतर्क वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दाणाणले आहेत.
प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार, वसई पूर्वेकडील मेढे परिसरामध्ये काही इसमांकडून खैर लाकडाची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणार असल्याची पक्की खबर वन विभागाला मिळाली होती. या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित परिसरात तातडीने विशेष नाकाबंदी व सापळा रचला. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास एक संशयित टाटा इन्ट्रा टेम्पो (क्रमांक MH 47 AS 2460) तिथून जात असताना निदर्शनास आला. वन कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन न थांबवता त्याचा वेग वाढवून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
वन पथकाने तात्काळ प्रसंगावधान दाखवत भरधाव वेगात सुमारे ७ ते ८ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्या संशयित टेम्पोला जेरबंद केले व रोखण्यात यश मिळवले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आणि तो पसार होण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर वन पथकाने पकडलेल्या त्या टेम्पोची पंचांसमक्ष कसून झडती घेतली असता, एक अत्यंत चलाख प्रकार समोर आला. तस्करांनी पोलिसांची आणि वन विभागाची दिशाभूल करण्यासाठी टेम्पोमध्ये वरच्या बाजूला भाजीपाल्याच्या गोण्या भरल्या होत्या आणि त्याच्या अगदी खाली बेकायदेशीररीत्या कटाई केलेले खैराचे लाकूड लपवून त्याची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
या धडाकेबाज कारवाईमध्ये वन विभागाने १.२८४ घनमीटर म्हणजेच एकूण ७७ नग खैर जातीचे ओंडके (लाकूड), ज्याची अंदाजे किंमत १४,८९२ रुपये आहे, तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर आणि मांडवीचे उपविभागीय वनअधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडण्यात आली. यात भाताणेचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनिष महाले, वनपाल आर. एस. माळगावी, व्ही. जी. राख, एन. बी. खुळपे तसेच वनरक्षक एस. एस. पवार, एल. एल. हमरे, डी. एन. सावरा व वनमजूर चंदन खानिवडेकर यांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. याप्रकरणी फरार झालेल्या चालकाचा व इतर मुख्य सूत्रधारांचा कसून शोध घेतला जात असून वन विभागाकडून या तस्करीमागील रॅकेटचा अधिक सखोल तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!























Subscribe to my channel




