कर्नाटकच्या राजकारणातून एक अत्यंत खळबळजनक आणि वादग्रस्त वृत्त समोर आले आहे. कर्नाटक विधानसभेत राज्याच्या दुष्काळ स्थितीवर आणि बंगळुरू शहराच्या वाढत्या लोकसंख्येवर चर्चा सुरू असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा प्रमुख नेते डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी केलेल्या एका विधानावरून मोठा राजकीय गदारोळ उडाला आहे. राज्याच्या विविध भागांतून बंगळुरूमध्ये येऊन स्थायिक झालेल्या आमदारांपैकी डझनभर आमदारांनी दोन विवाह केले आहेत, असा दावा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत असून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
विधानसभेत बोलताना डी. के. शिवकुमार यांनी बंगळुरू शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाचा आणि लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, बंगळुरूचा इतिहास असा आहे की, जो कोणी या शहरात येतो, तो सहसा आपली मूळ गावे सोडून परत जात नाही. बंगळुरू शहरात केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर इतर जिल्ह्यांमधून राजकारणासाठी आलेले अनेक आमदार आणि वकिलही इथेच स्थायिक झाले आहेत. पुढे बोलताना त्यांनी असा दावा केला की, "बाहेरून बंगळुरूला येऊन इथेच स्थायिक झालेल्या आमदारांपैकी जवळपास डझनभर आमदारांनी दोन लग्नं (दोन विवाह) केली आहेत. माझ्याकडे त्यांची यादी तयार असून मी हवे तर त्यांचे दाखलेही देऊ शकतो." धारवाड आणि दक्षिण कन्नड यांसारख्या जिल्ह्यांतून आलेल्या काही नेत्यांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत त्यांनी ही टिप्पणी केली, मात्र त्यांनी सभागृहात थेट कोणाचेही नाव घेणे टाळले.
भाजपचा तीव्र आक्षेप आणि नावांची मागणी: डी. के. शिवकुमार यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य अत्यंत अनावश्यक आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. इतर जिल्ह्यांतून बंगळुरूला आलेल्या प्रत्येक आमदारावर यामुळे संशयाची तलवार लटकत असून, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांची नावे जाहीर करावीत, अशी उघड मागणी भाजपने केली आहे.
याशिवाय भाजपचे ज्येष्ठ आमदार एस. सुरेश कुमार यांनीही यावर कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य कदाचित मस्करीत किंवा हलक्याफुलक्या वातावरणात केले असले, तरी विधानसभेच्या पवित्र सभागृहाच्या पटलावरून अशा प्रकारची विधाने करणे योग्य नाही. यामुळे संपूर्ण विधिमंडळाची आणि आमदारांची जनमानसात नाचक्की होऊ शकते आणि अनावश्यक कुतूहल किंवा संशय निर्माण होऊ शकतो. या वक्तव्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून, यावर राजकीय वर्तुळातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




