मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणास मोठी वळण; प्रसिद्ध रिलस्टार माधवी कुंभारला न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर!

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये घडलेल्या गंभीर मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि सोशल मीडियावरील प्रसिद्ध रिलस्टार माधवी कुंभार हिला अखेर पुण्यातील न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी माधवी कुंभारसह तिच्या इतर साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय होते? पुण्यातील डेक्कन परिसरातील एका कॅफेमध्ये पूर्ववैमनस्यातून आणि झालेल्या वादानंतर एका तरुणावर धारदार शस्त्रे, खुर्च्या आणि लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) आणि शस्त्र कायद्याच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत रिलस्टार माधवी कुंभारसह तिच्या अनेक साथीदारांना अटक केली होती. या गुन्ह्याप्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर आणि कायदेशीर बाबींचा विचार करून न्यायालयाने काही अटी व शर्तींच्या अधीन राहून माधवी कुंभारला जामीन मंजूर केला आहे. तक्रारदाराशी कोणत्याही प्रकारे संपर्क न साधण्याच्या आणि तपासात पूर्ण सहकार्य करण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *