डिजिटल स्ट्रीमिंगच्या युगात एखाद्या चित्रपटाचा प्रवास केवळ बॉक्स ऑफिसपुरता मर्यादित राहत नाही याचं ठळक उदाहरण म्हणजे सालार: पार्ट 1 – सीजफायर हा चित्रपट. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
सुमारे 270 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 617.75 कोटी रुपयांची कमाई केली. भारतातच त्याने 406.45 कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाची निर्मिती होम्बले फिल्म्स यांनी केली होती.
‘केजीएफ’नंतर प्रशांत नीलची मोठी झेप
दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केजीएफ फ्रँचायझीमुळे मोठी फॅन फॉलोइंग मिळवली. त्यानंतर त्यांनी या चित्रपटात प्रभासला मुख्य भूमिकेत घेत भव्यदिव्य अॅक्शन ड्रामा सादर केला. चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुति हासन, जगपति बाबू, बॉबी सिम्हा आणि श्रेया रेड्डी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. संगीत दिग्दर्शन रवि बसुर यांनी केलं.
‘सालार: पार्ट 1’ची कथा ‘खानसार’ या काल्पनिक शहर-राज्यावर आधारित आहे. जिथे अजूनही राजशाही व्यवस्था अस्तित्वात आहे. निर्वासित राजकुमार देवा (प्रभास) आणि विद्यमान राजकुमार वरधा (पृथ्वीराज सुकुमारन) यांची मैत्री ही कथानकाचा गाभा आहे. सत्तापालटाच्या कटकारस्थानांमुळे वरधाला सिंहासन मिळवण्यासाठी देवाची मदत घ्यावी लागते आणि त्यातून उलगडतो एक भव्य संघर्ष.
ओटीटीवर सलग 366 दिवस ट्रेंडिंग
थिएटरनंतर हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तो तब्बल 366 दिवस प्लॅटफॉर्मच्या ट्रेंडिंग यादीत कायम राहिला. या यशानंतर प्रभासने सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानले.
चित्रपटाच्या सिक्वेलचं नाव सालार: पार्ट 2 – शौर्यंगा पर्वम असं जाहीर करण्यात आलं आहे. 2024 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं असून दिग्दर्शनाची धुरा पुन्हा प्रशांत नील यांच्याकडेच आहे. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन पुन्हा एकदा मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मात्र इतर कलाकार आणि कथानकाबाबतची माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे. रिलीज डेटबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




