मला माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी स्वतःस्वयंपाक करण्याची वेळ क्वचित आली आहे. भारतीयसमाजात महिलेसाठी ही अत्यंत दुर्मीळ बाब मानलीजाईल. त्या अर्थाने मी विशेषाधिकार लाभलेली आहे.माझे दिवंगत पती व प्रसिद्ध पत्रकार-लेखक कांती भट्टयांना स्वयंपाक करता येत असे. त्यांना त्यांच्याआवडीचे ‘कच्चा-पक्का जेवण’ खायचे असे, तेव्हा तेस्वतःसाठी स्वयंपाक करत. त्यांच्या हातची दुधीभोपळ्याची भाजी चांगली झाल्यास त्या आनंदाला वाचकांना सांगितल्याशिवाय त्यांना राहवत नसे. दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या दैनिक स्तंभात त्याचा उल्लेखहमखास असे. ते अन्नाकडे नेहमी व्यापक दृष्टिकोनातून पाहत असत. हे थोडे विचित्र वाटू शकते. पण रोजचे जेवण मेहनत न करता ताटात मिळणे म्हणजे समाधानाची हमी नाही. विशेषतः ऑनलाइन अन्न मागवून देणारे ॲप्सआल्यापासून मला अधिक जाणवू लागले आहे कीस्वतः स्वयंपाक करण्यात किंवा प्रियजनांसाठी जेवण बनवण्यात एक विलक्षण सौंदर्य असते. मी या ॲप्सचावापर करते, तितकी घरच्या जेवणाची किंमत अधिकजाणवते. आणि अर्थातच आपण सर्वजण आपल्याआईच्या हातच्या जेवणाचे चाहते असतो. माझ्याहीमनात आईच्या हातच्या जेवणाच्या असंख्यअविस्मरणीय आठवणी आहेत. गेल्या चार दशकांत मीमाझ्या जेवणाबाबत कधीच पूर्णपणे समाधानी राहिलेनाही. याचे मोठे कारण म्हणजे माझी आई अप्रतिमस्वयंपाकी होती. लग्नानंतर तिच्या हातच्या चविष्टपदार्थांना मी कधीच विसरू शकले नाही. 1979 मध्येम्हणजे तब्बल 47 वर्षांपूर्वी मी आईचे घर सोडले. पणतिच्या हातच्या अन्नाची चव आजही जिभेवर रेंगाळते.या भावनेचे शास्त्रीय विश्लेषण करण्याइतकी माझ्याकडेक्षमता नाही. पण त्या चवीची आठवण आजही डोळेपाणावून का टाकते, हे मला माहीत आहे. माझा ठामविश्वास आहे की आई स्वयंपाक करताना त्यात आपलेसंपूर्ण मन ओतते. तिचे मन सतत विचार करत असेआणि तिचे हात असे काहीतरी बनवत असत की कठीणप्रसंगातही मनाला दिलासा मिळे. मी खट्टू झाले की आईमाझ्या आवडीचे दहीवडे बनवत. हसऱ्या चेहऱ्यानेमाझ्यासमोर वाढत असे. आयुष्याच्या अशा टप्प्यावर मीआहे. येथे मला आवडती कार किंवा कपडे विकत नघेतल्याची खंत नाही. पण आईला ‘मेथी नुं वेषण’ कसेबनवायचे, हे मी कधी विचारले नाही, याची खोल खंतआहे. आई ताजी मेथीची पाने बेसनाच्या पिठासोबतशिजवत असे. कधी ती कोरडी भाजी बनवत असे, तरकधी त्यात ताक घालत असे. हिंग आणि मोहरीच्याबारीक फोडणीने ती मेथीची चव अप्रतिम संतुलित करतअसे. एकदा माझ्या पतींनी एक खंत व्यक्त केली होती. माझे व आईचे नाते परिपक्व आहे. तितके आम्हापती-पत्नीचे होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते.मी त्यांना विचारले, ‘का?’ त्यावर कांती म्हणाले,‘कारण तिच्या हातच्या जेवणाने तुला तिच्याशी घट्टबांधून ठेवले आहे.’ आईच्या हातच्या पोळ्यांचे वर्णनकरायचे झाले तर तिने गुजराती रोटली बनवण्याच्याकलेत पूर्ण प्रावीण्य मिळवले होते. ती नेहमी गव्हाचीपोळी बनवत असे. मऊसर कणकेचा गोळा तिच्यालाटण्याखाली एका ठरावीक लयीत गोल फिरत असे.तिचे ते भांडे नेहमी चुलीजवळच ठेवलेले असे.मुंबईतील तिच्या स्वयंपाकघरात तब्बल ५५ वर्षांत त्यापात्राची जागा कधी बदलली नाही. तव्यावर भाजली कीपोळी अगदी परिपूर्ण गोल आकारात फुलत असे. रेशमासारखी मऊ, तोंडात टाकताच विरघळणारी.तिच्या पोळ्या कागदाइतक्या पातळ असत. आईच्याहाताच्या स्पर्शाशिवाय कोणतेही जेवण माझ्यासाठीदहापैकी दहा गुणांचे ठरले नाही. लग्नानंतर मी रोजतिच्या हातच्या जेवणापासून दूर असल्याचे दुःख तिलापूर्णपणे समजत होते. तिच्या पोळ्यांनी माझे खूप लाडकेले होते. एकदा तिने मला सल्ला दिला की माझ्यापंजाबी घरमालकीणीला तिच्यासारख्या पोळ्याबनवायला सांग. त्यावर मी आईला म्हणाले, ‘मी त्यांनाकसे सांगू की मला पोळी खायला आवडते. जाडसरपोळी नाही! (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.) लग्नानंतरही मी आईने बनवलेले गुजरातीपदार्थ, त्यांची चव व तिच्या हातची पोळीकधीच विसरू शकले नाही. आईच्याहातच्या अन्नाची ही ओढ भारतात काहीअसामान्य नाही. बहुतांश मुलांसाठीआईचे जेवण हेच पाककलेचे सर्वोच्चमापदंड असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
- मुंबई: ओबीसी समाजाच्या विकासासाठी मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शासकीय जागा मिळणार केवळ १ रुपयात!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नंदनवन लॉन्समध्ये ‘शिवाजी महाराज चरित्र कथा’ला प्रारंभ! 🚩🙏
DSP चौकात वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई! 🚔⚠️
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैद! 📹⚠️
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




