गेल्या आठवड्यात माझ्या एका मित्राने मला व्हिडिओ कॉल केला. तो हिरव्यागार डोंगरदऱ्यात उभा असावा असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तो एका मठातील वर्गात होता. विद्यार्थी डोळे मिटून जमिनीवर मांडी घालून बसले होते. लांब कुठेतरी घंटा वाजत होत्या, खोलीत पूर्ण शांतता होती आणि एक बौद्ध भिक्खू ध्यानासह दिवसाचा पहिला तास सुरू करत होते. ते तिबेटी भाषेत बोलत होते आणि प्रत्येक काही वाक्यांनंतर थांबत होते, जेणेकरून अनुवादक त्यांची शिकवण समजून सांगू शकेल. त्यांनी ध्यान पूर्ण केल्यानंतर एका कॅनेडियन मानववंशशास्त्रज्ञाने इतिहासाचा तास सुरू केला. मित्राने वर्गातून बाहेर येऊन मला विचारले, “सांग, मी कुठे होतो?” मला पहिल्या प्रयत्नात उत्तर देता आले नाही. जेव्हा मी विचारले की, “इतक्या वेगवेगळ्या देशांचे विद्यार्थी तिथे कसे काय बसले आहेत?” तेव्हा त्याने सांगितले की, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह 40 देशांतील शेकडो विद्यार्थी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी का-निंग शेद्रुब लिंग मठात येतात. हा मठ प्रसिद्ध बोधनाथ स्तुपाच्या उत्तरेला काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यानंतर आमची चर्चा या विषयावर सुरू झाली की, दरवर्षी हजारो नेपाळी विद्यार्थी पदवी आणि चांगल्या संधींच्या शोधात ऑस्ट्रेलिया, भारत, ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशांतील विद्यापीठांत जातात, ज्या सुविधा नेपाळमध्ये उपलब्ध नाहीत. पण, एक छोटासा शैक्षणिक प्रवास विरुद्ध दिशेनेही होत आहे, ज्याची आपल्याला माहिती नाही. हे विद्यार्थी बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी काठमांडूमध्ये येत आहेत. काही जण अल्पकालीन उन्हाळी विशेष अभ्यासक्रमात प्रवेश घेतात आणि नंतर ते क्रेडिट्स परदेशी विद्यापीठांमध्ये हस्तांतरित करतात. काही विद्यार्थी काठमांडू विद्यापीठ बौद्ध अध्ययन केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या सत्र विनिमय कार्यक्रमांतर्गत अभ्यास करण्यासाठी तिथेच राहतात. 30 वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही संस्था सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या एका छोट्या गटाने सुरू केली होती, ज्यांना तिबेटी बौद्ध शिक्षक चोक्यी न्यिमा रिनपोछे यांच्याकडून शिकायचे होते. लवकरच संस्थापकांना जाणीव झाली की, जर बौद्ध शिक्षणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून द्यायची असेल, तर ते विद्यापीठाच्या चौकटीत आणले पाहिजे. 2002 मध्ये संस्थेने औपचारिकपणे काठमांडू विद्यापीठाशी भागीदारी करून बौद्ध अध्ययन केंद्राची स्थापना केली. त्या वेळी तिथे केवळ 36 विद्यार्थी होते. आज त्यांच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये 169 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत आणि दरवर्षी सुमारे 100 विद्यार्थी उन्हाळी विशेष अभ्यासक्रम पूर्ण करतात. माझा मित्र वेगवेगळ्या धर्मांच्या विद्यार्थ्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याच्या पद्धतीचे खूप कौतुक करत होता. विद्यार्थ्यांचे हे कार्य पाहून मला 1968 मधील ‘अनोखी रात’ चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले एक गीत आठवले - ‘ओह रे, ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना।’ मला वाटले की, या गाण्याचे बोल आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीवर किती चपखल बसतात. आयआयटी जम्मूचेच उदाहरण घ्या. त्यांनी या शैक्षणिक वर्षात ‘युनिफाइड इंजिनिअरिंग’ नावाचा नवीन बीटेक कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे, ज्यांना पारंपरिक एकाच विषयाच्या अभियांत्रिकीच्या पुढे जायचे आहे. हा कार्यक्रम जेईई ॲडव्हान्स्डच्या उमेदवारांसाठी खुला असून, त्याचा अभ्यासक्रम पूर्णपणे नवीन आणि व्यावहारिक आहे. यात अभियांत्रिकीच्या अनेक क्षेत्रांना एकत्र जोडले आहे. सिस्टीम इंजिनिअर, उत्पादन विकास अभियंता, ऑटोमेशन तज्ज्ञ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ यांसारख्या विविध जबाबदाऱ्या सांभाळू शकणारे पदवीधर तयार करणे हा याचा उद्देश आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अशी बहुआयामी कामे का आवश्यक आहेत? आज लोकप्रिय होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचेच उदाहरण घ्या. ही वाहने बाजारात चांगली कामगिरी करतील हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतील तज्ज्ञांची गरज लागते. तसेच स्मार्ट सिटीजसाठी सिव्हिल इंजिनिअर्स, डेटा विश्लेषक आणि शाश्वत विकासाचा अभ्यास करणाऱ्यांची गरज असते. थोडक्यात सांगायचे तर, अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटा आता पूर्वीपेक्षा खूप व्यापक होत आहेत. फंडा असा की... जर तुम्हाला खरोखर ज्ञानवंत बनायचे असेल, तर तुम्हाला एका छोट्या ‘तळ्या’तून बाहेर पडून ‘नदी’ची मदत घ्यावी लागेल, जेणेकरून तुम्ही ‘ज्ञानाच्या सागरा’पर्यंत पोहोचू शकाल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



