बीबीसीच्या ‘सीबीबीज’ या प्री-स्कूल प्लॅटफॉर्मवर झोपण्यापूर्वी ऐकण्याची एक गोष्ट दाखवली जाते. तिचे नाव आहे ‘द लॉस्ट स्टार’. एका संध्याकाळपासून या गोष्टीची सुरुवात होते. छोटी लिली तिच्या बागेत मंद प्रकाशणारा एक छोटासा तारा पाहते. ती त्याला विचारते, तू इथे कसा आलास? तारा हळूच कुजबुजतो, मी आभाळातून खाली पडलोय आणि मला घरी परतण्याचा रस्ता सापडत नाहीये. लिली आपल्या मांजरीची मदत मागते. पण मांजर फक्त झाडांवरच चढू शकते. घुबड उंच उडू शकते, पण ताऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. हार न मानता लिली आईची मदत घेते. दोघी मिळून त्या ताऱ्याला एका झाडाच्या सर्वात उंच फांदीवर ठेवतात. वाऱ्याची एक झुळूक त्याला आकाशात घेऊन जाते. तिथे तो तारा तीनदा चमकतो आणि अंधारात विरून जातो. ही गोष्ट एका साध्या शिकवणीवर संपते. कुणाचीही मदत करण्यासाठी तुम्ही खूप ताकदवान किंवा मोठे असण्याची गरज नसते. तुमची दयाळूपणाची भावना व प्रबळ इच्छाशक्तीच काम करून जाते. सीबीबीज हा बीबीसीचा लहान मुलांसाठीचा टीव्ही ब्रँड आहे. 5 वर्षे किंवा त्याहून लहान मुलांसाठी 2002 मध्ये तो सुरू करण्यात आला. खेळता-खेळता मुलांना शिकवणे, हे यामागचे मुख्य तत्त्व आहे. गोष्टी, ॲनिमेशन, गाणी आणि रोजच्या घडामोडींच्या माध्यमातून हा ब्रँड मुलांना अंकमोजणी, भाषा, मैत्री, आपल्या वस्तू इतरांसोबत वाटून घेणे व दयाळूपणा शिकवतो. यातून त्याने आपल्या कार्यक्रमांची अशी विश्वासार्ह प्रतिमा तयार केली. त्यावर पालक डोळे झाकून विश्वास ठेवतात. ब्रिटनमध्ये बीबीसीवर रात्रीच्या गोष्टी पाहणे ही एक कौटुंबिक परंपरा होती, असा एक काळ होता. पालक हेच कार्यक्रम पाहत लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मुलांनीही तेच कार्यक्रम पाहिले. गोष्टी, कार्टून आणि रात्रीच्या मनोरंजनाच्या माध्यमातून नातवंडांची नाळही बीबीसीशी जोडली गेली. मात्र, पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही निष्ठा आता कमकुवत होऊ लागली आहे. हा बदल रोखण्यासाठी बीबीसीने वेगळा मार्ग निवडला. बीबीसी आता आपले कार्यक्रम नेटफ्लिक्सवर आणत आहे. 2 डिसेंबरपासून सहा महिन्यांच्या एका प्रयोगाअंतर्गत बीबीसी जगभरातील नेटफ्लिक्सवर स्वतंत्र ‘सीबीबीज हब’ सुरू करणार आहे. चीन, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश वगळता इतर सर्वत्र हा हब उपलब्ध असेल. यावर 24 निवडक कार्यक्रम दाखवले जातील. यात ‘टेलेटबीज’, ‘हे डगी’ आणि ‘नंबरब्लॉक्स’ यांसारख्या अत्यंत लोकप्रिय पात्रांचा व कार्यक्रमांचा समावेश आहे. इतका मोठा वारसा लाभलेल्या संस्थेला अखेर नेटफ्लिक्सची गरज का भासली? कारण आता प्रेक्षक बदलले आहेत. आवडत्या कार्यक्रमाच्या ठरावीक वेळेची वाट पाहण्याऐवजी आजची मुले यूट्यूब, नेटफ्लिक्स व डिस्ने प्लससोबत मोठी होत आहेत. तरुण पालकांसह 16 ते 34 वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे आपले साप्ताहिक प्रमाण घटल्याचे बीबीसीच्या लक्षात आले. 2021-22 मधील 81 टक्क्यांवरून 2025-26 मध्ये ते थेट 63 टक्क्यांवर आले. म्हणूनच बीबीसी आपल्या कार्यक्रमांच्या वितरणाचे धोरण बदलत आहे. तरुण कुटुंबांनी ‘बीबीसी आयप्लेअर’ प्लॅटफॉर्मवर यावे, अशी अपेक्षा धरण्याऐवजी ते आधीच वेळ घालवत आहेत, तिथेच बीबीसी आपल्या कार्यक्रमांची झलक पोहोचवत आहे. विशेष म्हणजे, बीबीसी आपल्या कार्यक्रमांची मालकी पूर्णपणे सोडत नाहीये किंवा स्वतःचा प्लॅटफॉर्मही बंद करत नाहीये. सीबीबीजचा पूर्ण अनुभव घेण्यासाठी ‘आयप्लेअर’ हेच मुख्य ठिकाण राहील. मात्र, नेटफ्लिक्सही सीबीबीजच्या काही कार्यक्रमांची सुरुवात करून देण्यास मदत करेल. बीबीसी आपली ओळख सोडत नसून ती एका नव्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचवत आहे. यातून नेटफ्लिक्सला मुलांसाठी विश्वासार्ह कार्यक्रम मिळतील. बीबीसीला प्रेक्षकांना टिकवून ठेवणे कठीण जात होते. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. पालकांचा विश्वास कमावण्यासाठी बीबीसीने अनेक दशके खर्ची घातली. आता त्यांच्या मुलांनाही दुसऱ्या एका स्क्रीनवर तोच विश्वास मिळावा, अशी बीबीसीची इच्छा आहे. यूट्यूब, नेटफ्लिक्ससोबत मोठी होणारी ‘जेन-अल्फा’ ही बीबीसीशी कोणतेही नाते नसलेली पहिली पिढी ठरू नये, याची बीबीसी काळजी घेत आहे. तर दुसरीकडे, भारतातील तरुण पालकांकडेही मुलांसाठी आणखी नवनवीन गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. फंडा असा आहे की - पारंपरिक संस्था व उद्योगांनी हे समजून घेतले पाहिजे की ब्रँडची निष्ठा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप जात नाही. एखाद्या ब्रँडने बदलत्या सवयींनुसार स्वतःला घडवले नाही, तर तो कालबाह्य ठरू शकतो. अनेकदा आपला वारसा जपण्यासाठी मार्ग बदलावा लागतो. जेणेकरून पुढची पिढी त्या वारशापर्यंत सहज पोहोचू शकेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




