गेल्या शुक्रवारी संध्याकाळी पुण्याच्या पिंपळे सौदागर येथील 43 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट मनोज मालपाणी एका असामान्य आणि धोकादायक प्रसंगाला सामोरे गेले. ते मुंबई विमानतळावरून पुण्याला कॅबने चालले होते. त्यांनी पाहिले की, चालक वारंवार जांभया देत होता आणि डोळे उघडे ठेवण्यासाठी धडपडत होता. किमान दोन वेळा तर चालकाचा स्टिअरिंगवरच डोळा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मालपाणी भयभीत झाले. ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होते, जिथे क्षणाचा निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो. रात्री सुमारे 8.30 वाजता कॅब एका फूड मॉलजवळ थांबली, तेव्हा मालपाणी यांनी चालकाकडे याबद्दल विचारणा केली. सलग काम केल्यामुळे आपण खूप थकलो असून झोप येत असल्याची कबुली चालकाने दिली. मालपाणी यांनी चालकाला विश्रांती घेण्यास सांगितले आणि स्वतः गाडी चालवण्याची तयारी दर्शवली. चालक लगेच तयार झाला. त्याने सीट मागे केली आणि तो झोपी गेला. मालपाणी यांनी पहिल्या टोल नाक्यापर्यंत गाडी चालवली. तिथेही चालक अर्धवट झोपेतच असल्याचे पाहून त्यांनी थेट पुण्यापर्यंत गाडी चालवली आणि रात्री सुमारे 10.30 वाजता ते पोहोचले. त्यांनी चालकाला उठवून गाडी स्वाधीन केली आणि भाडे दिले. दुसऱ्याची कॅब चालवणे योग्य नव्हते हे त्यांनी मान्य केले, पण जीवाच्या सुरक्षिततेसाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. या घटनेनंतर संबंधित कॅब कंपनीने त्या चालकाचा ॲपवरील प्रवेश बंद केला आणि मालपाणी यांना भाड्याची रक्कम क्रेडिटच्या स्वरूपात परत केली, परंतु या घटनेने ॲपआधारित चालकांच्या कामाच्या परिस्थितीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. इंडियन गीग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष केशव क्षीरसागर सांगतात की, चालकांच्या कामाचे तास निश्चित नसतात आणि तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांच्यावर सतत काम करण्याचा ताण असतो. या घटनेने मला मुंबईतील मध्यमवर्गीय गृहनिर्माण सोसायट्यांमधील एका नेहमीच्या दृश्याची आठवण करून दिली. गेटवर सुरक्षा रक्षक गाढ झोपलेला असतो आणि संतापलेला एखादा रहिवासी त्याला जागे करतो. या दोन्ही परिस्थिती वरवर वेगवेगळ्या वाटू शकतात, पण त्यात एक साम्य आहे. दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सतर्क राहण्याची अपेक्षा असते; परंतु त्यांची मिळकत मात्र रोजच्या गरजा भागवण्याइतकीही नसते. निवासी सोसायट्यांमध्ये कंत्राटी संस्थांमार्फत नेमलेल्या सुरक्षा रक्षकांचेच उदाहरण घ्या. त्यांपैकी अनेकांना 30 दिवसांच्या ड्यूटीचे 10 हजार रुपयांपेक्षाही कमी वेतन मिळते. एवढ्या कमी पैशांत कुटुंब चालवणे कठीण असते, विशेषतः मुंबईसारख्या महागड्या शहरात घरभाडे, जेवण, मुलांच्या शाळेची फी, औषधोपचार आणि प्रवासाचा खर्च पगाराच्या दिवसाची वाट पाहत नाहीत. त्यामुळे काही सुरक्षा रक्षक दुसरी ड्यूटीही करतात, जेणेकरून त्यांना महिन्याला सुमारे 20 हजार रुपये मिळतील. ते दिवसातून 18 ते 20 तास काम करू लागतात. अशा स्थितीत कामावर येण्या-जाण्यासाठी, जेवणासाठी आणि पुरेशी झोप घेण्यासाठी त्यांच्याकडे फारच कमी वेळ उरतो. झोपेच्या अभावामुळे एकाग्रता, निर्णयक्षमता, तत्परता आणि मानसिक संयम यांवर परिणाम होतो. अखेर शरीर अशा गोष्टीची मागणी करू लागते, ज्याची परवानगी खिसा देत नाही... म्हणजे विश्रांती. विश्रांती न मिळाल्यामुळे एखादा सुरक्षा रक्षक गाफील राहू शकतो, एखाद्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटू शकते आणि एखाद्या डिलिव्हरी कर्मचाऱ्याकडून चूक होण्याची शक्यता वाढू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या कामांमध्ये याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. दीर्घकाळाचा विचार करता याची आणखी एक किंमत चुकवावी लागते. सततचा थकवा आणि अपुरी विश्रांती यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य ढासळू शकते. अतिरिक्त काम करून मिळवलेल्या पैशांची किंमत आरोग्याने मोजावी लागू शकते. पुढे जाऊन वैद्यकीय बिलांचा खर्च कुटुंबावर आर्थिक भार वाढवू शकतो. महिन्याच्या एका पगारावर जगणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी अतिरिक्त कामाचा अर्थ वेळेवर शाळेची फी भरणे किंवा कुटुंबाचा किराणा सामान आणणे हा असतो. आरोग्याच्या दृष्टीने जादा काम नाकारणे हा शहाणपणाचा निर्णय ठरू शकतो, पण पोटाची भूक भागवण्यासाठी तसे करणे अनेकदा अशक्य असते. फंडा असा आहे की, जगण्यासाठी एक कामगार आपल्या झोपेचा बळी कधीपर्यंत देत राहणार? उशिरा का होईना, त्याचे आरोग्य अखेर साथ सोडणारच. एक समाज म्हणून जोपर्यंत आपण हे वास्तव समजून घेणार नाही आणि आपल्या कामगारांना एका पाळीच्या कामातूनच मूलभूत गरजा पूर्ण करता येतील इतके वेतन देणार नाही, तोपर्यंत आपल्याला अशाच सेवा मिळत राहतील, ज्या आपल्या जिवाला आणि मालमत्तेला गंभीर धोक्यात आणू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर कारखान्यावर ऐतिहासिक विजय! अजितदादांचा ग्रामीण भागातील प्रभाव आजही कायम, विजयानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: संकश्र्वर-आजरा मार्गावर भीषण अपघात! गोव्याहून प्री-वेडिंग शूट आटोपून नांदेडला परतणाऱ्या तरुणाच्या कारचा भीषण अपघात, जागीच मृत्यू
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




