इथे कचरा का टाकला? तरुणांची तुंबळ हाणामारी, एकावर धारदार शस्त्राने वार, VIDEO

image

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबई: तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किरवली मधील ॲमेझॉन कोल्ड स्टार वेअर हाऊस वर काम करणाऱ्या तिघांना कचरा टाकण्याच्या वादातून जवळपास 20 पेक्षा जास्त मुलांनी मिळून काठी,खुर्च्या,पट्ट्याने जबर मारहाण केल्याच्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ हाती लागला असून घटनेची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून यातील शोएब शेख आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मात्र व्हिडीओमध्ये दोनपेक्षा खूपच जास्त व्यक्ती मारहाण करताना दिसत आहेत.

मात्र, नक्की कचऱ्यावरून इतके टोकाचे भांडण झाले का,की इतक्या जणांनी तिघांवर जीवघेणा हल्ला केला,याबाबत कोणताही खुलासा नाही.मारहाण झालेल्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यातील ऋषिकेश वावेकर याच्या डोक्यावर चाकूने वार झाला असून केतन गोंधळी आणि राहुल माळी यांनाही जबर दुखापत झाली आहे.आता पोलिस याबाबत आणखी काय कारवाई करत आहेत हे पाहणे महत्वाचे असेल.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *