‘शाळा दुरुस्त करा'' अभियानामुळे एक भयावह वास्तवसमोर आले आहे. देशभरातील अनेक प्राथमिक आणिमाध्यमिक शाळांमधील मुले रोज या कटू सत्यालासामोरी जात आहेत. यातील काही शाळांची अवस्था तरअतिशय वाईट आहे. सीजेपीच्या नेतृत्वाखाली झालेल्या‘जेन-झी''च्या आंदोलनांपासून प्रेरणा घेऊन शाळकरीमुले, म्हणजेच ‘जेन-अल्फा'' आता रस्त्यावर उतरलीआहेत. स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वर्गखोल्या, पक्केरस्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षक या मूलभूतसुविधांची मागणी ही मुले करत आहेत. ‘जेन-अल्फा''चे हे आंदोलन आता यूपी, राजस्थान,मध्य प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि बिहारपर्यंतपोहोचले आहे. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्यामुद्द्यावरून ‘जेन-झी ''ने देशातील प्रमुख शहरे रोखूनधरली होती. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देणे भाग पडले होते. या घटनेमुळे सरकार आधीच बॅकफूटवरआले होते. त्यातच आता शाळकरी मुलांचे रस्त्यावरउतरणे म्हणजे सरकारसाठी एका वाईट स्वप्नासारखेआहे. या लहान मुलांवर पोलिस बळाचा वापरही करू शकत नाहीत. दुर्दैवाची बाब म्हणजे, खुद्द सरकारचीच अधिकृत आकडेवारी ग्रामीण भागातील शिक्षणाची दैना समोर आणते. नीती आयोगाच्या नुकत्याच आलेल्याएका पाहणीनुसार गेल्या 10 वर्षांत 94 हजारांहून अधिकशाळा बंद झाल्या. यात एकट्या उत्तर प्रदेशातील 26हजार शाळांचा समावेश आहे. सरकारी शाळाचालवण्यासाठी निधी कमी पडत आहे. त्यातच उच्चमाध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण मोठेआहे. त्यामुळे वर्गच्या वर्ग रिकामे होत आहेत. सुमारे 73टक्के विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्णकरण्यापूर्वीच शाळा सोडतात. शाळा गळतीची अनेककारणे नीती आयोगाच्या पाहणीत समोर आली आहेत.आर्थिक क्षमता असलेले पालक आपल्या मुलांनामहागड्या खासगी शाळांमध्ये पाठवणे पसंत करतात.तिथे शिक्षणाचा दर्जा चांगला असतो. पण हे परवडतनाही, ते माध्यमिक स्तरावरच मुलांचे शिक्षण थांबवतात.कारण सरकारी शाळांमध्येही गणवेश, पुस्तके आणिपरीक्षा फी यांसारखे खर्च असतात. हे खर्च उचलणे यापालकांना शक्य होत नाही. याउलट, प्राथमिक शिक्षणमात्र जवळपास मोफत आहे. गरीब कुटुंबांवर असणाऱ्या आर्थिक ताणामुळे मुलांनाशाळा सोडून कामाला लागावे लागते. 2020-21 च्या‘पिरियॉडिक लेबर-फोर्स सर्वे'' नुसार 14 ते 17वयोगटातील 31 टक्के किशोरवयीन मुले काम करतहोती. तर 25 टक्के मुलींनी घरातील कामांत आईलामदत करण्यासाठी शिक्षण सोडून दिले होते. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा वार्षिक अहवालशाळांच्या पायाभूत सुविधांचे गुलाबी चित्र दाखवतो.पण दुसरीकडे राजस्थान सरकारच्या 2025 मधील एकापाहणीनुसार वास्तव फार वेगळे आहे. या पाहणीतराज्यातील हजारो शाळांच्या इमारती आणि सुविधांमध्येगंभीर त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. सुमारे 87 हजारवर्गखोल्या अत्यंत जर्जर अवस्थेत होत्या. अखेरन्यायालयाला यात हस्तक्षेप करून त्यांच्या वापरावर बंदीघालावी लागली. राज्यातील 64 हजार शाळांपैकी 2हजारांहून अधिक शाळांमध्ये स्वच्छतागृहे नव्हती. तर 1हजारांहून अधिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोयनव्हती. 600 हून अधिक शाळांना स्वतःची इमारतचनव्हती. तेथील विद्यार्थ्यांना पत्र्याच्या छताखाली किंवाझाडांखाली बसावे लागत होते. नुकतेच लखनऊमध्येसर्वोदय शाळेच्या 250 विद्यार्थिनींनी शिक्षकांचीकमतरता आणि वाईट सुविधांविरोधात धो-धो पावसातमोर्चा काढला. गया येथेही निकृष्ट दर्जाचे मध्यान्ह भोजन, बिघडलेले हँडपंप आणि घाणेरड्या स्वच्छतागृहांच्याविरोधात मुलांनी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकदिली. विकसित भारताचा पाया मानल्या जाणाऱ्याआपल्या युवा पिढीची हीच ती अवस्था आहे का? ‘जेन-अल्फा''ने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तोडगाकाढण्यासाठी जिल्हा प्रशासन आता पळापळ करतआहे. पण असे दिसते की ‘जेन-अल्फा'' आता ‘जेन-झी''सारखीच खूप पुढे निघून गेली आहे. सरकारे ठोस कामकरायला सुरुवात करत नाहीत, तोपर्यंत या दोन्ही पिढ्याआता थांबणार नाहीत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ‘जेन-अल्फा'' ने मांडलेल्या प्रश्नांवर मार्गकाढण्यासाठी आता धावपळ सुरू झालीआहे. पण असे दिसते की ‘जेन-अल्फा''सुद्धा ‘जेन-झी ''सारखीच पुढे निघून गेलीआहे. सरकारे प्रत्यक्ष काम करायलासुरुवात करत नाहीत, तोपर्यंत या दोन्हीपिढ्या थांबणार नाहीत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
महाराष्ट्र
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
- गोवा: कुल-मुंडकार प्रकरणांबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणांची होणार सोडवणूक!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




