अहिल्यानगर: कल्याण महामार्गावर भाळवणी गावच्या शिवारात हॉटेल संदीपसमोर गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि वॅगनर कारची भीषण समोरासमोर धडक झाली. या अपघातात वॅगनरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू (Accident News) झाला आहे. मृतांमध्ये शकील शेख, सलमा शेख, ईकबाल शेख आणि सुमैय्या शेख यांचा समावेश आहे. मृत व्यक्ती हे मुंबईच्या मालवणी येथील असल्याची माहिती आहे. याबाबत अल्ताफ शेख यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शकील शेख हे कुटुंबासह अहिल्यानगर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी वॅगनर कारमधून येत होते. पहाटे दोनच्या सुमारास भाळवण शिवारातील हॉटेल संदीपसमोर त्यांच्या कारला आयशर टेम्पोने समोरून जोराची धडक दिली. धडकेनंतर वॅगनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमधील प्रवासी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेलामाहिती दिली. त्यानंतर जखमींना पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चौघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळी थांबला नाही, अशी फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चालकाविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास करण्यात येत आहे.
नातेवाईकांची भेट राहिली अधुरी
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भाळवणी शिवारात हॉटेल संदीपसमोर आयशर टेम्पो व कारची समोरासमोर धडक झाली. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. याबाबत अल्ताफ शब्बीर शेख (वय ५२, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुरुवारी रात्री शकील शेख हे येथे कुटुंबासह अहिल्यानगर नातेवाईकांना भेटण्यासाठी कारमधून (एमएच ४७सीके १३०८) येत होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास भाळवणी शिवारातील हॉटेल संदीपसमोर त्यांच्या कारला आयशर टेम्पोची (एमएच १६ सीडी २७४७) समोरून धडक बसली. त्यात कारमधील शकील शेख, सलमा शेख, इकबाल शेख व सुमैय्या शेख हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, चौघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सकाळी जाहीर केले.
भंडाऱ्यातील भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये ६ महिला आणि ३ बालकांचा समावेश
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी साकोली तालुक्याच्या पिंपळगाव येथे आयशर आणि ट्रॅक्स गाडीचा अपघात झाला. मृतक हे सर्व छत्तीसगडचे मजूर आहेत, नागपूरच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला. छत्तीसगडमधून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात झाला. या वाहनांमध्ये एकमेव पुरुष चालक आणि सर्व महिला आणि त्यांचे छोटे बालक नागपूरकडे प्रवास करीत होते. या भीषण अपघातात घटनास्थळावर ८ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या संख्येत आणखी एक वाढ झाली असून नागपूरला उपचारासाठी नेण्यात येणाऱ्या एका महिलेचा वाटेत मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांचा आकडा आता ९ वर पोहोचला आहे.
मृतांमध्ये ६ महिला आणि ३ बालकांचा समावेश आहे. ५५ वर्षीय एका महिलेसह मृत पावलेल्या उर्वरित सर्व महिला या ३५ वयोगटातील आहेत. तर, ३ बालक हे सर्व ५ वर्षाखालील आहे. या सर्व अपघातग्रस्त महिला छत्तीसगडमधून नागपूर येथील त्यांच्या माहेरी तिज उत्सवासाठी जात असताना हा भीषण अपघात राष्ट्रीय
महामार्गावरील पिंपळगाव जवळ पहाटेच्या सुमारास घडला. सोमनाथ वर्मा या व्यक्तीच्या कुटुंबातील आई, बहीण, भाची आणि बहिणीची जाऊबाई अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये १६ ते १७ जण प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये ३ बालकांवर तर उर्वरितांना नागपूर मेडिकल कॉलेजला हलविण्यात आलं आहे. वाहन चालक हा या अपघातात वाचला असून त्याच्यावर भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहे. मन हेलावरून आणि पिळवटून टाकणारा अपघात घडला असून छोटे बालक यात आपल्या आईला पोरके झाल्याचं विदारक दृश्य भंडाऱ्यात बघायला मिळत आहे. घटनेचा पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहे.
नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघातात ८ ठार, ७ जखमी
नांदेड-भोकर मार्गावर गुरुवारी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ट्रक आणि पिकअप वाहनात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. सर्वत्र पोळा साजरा केला जात असताना भोकर तालुक्याला मात्र एका भीषण अपघाताच्या घटनेला सामोरे जावे लागले. आठ जणांच्या मृत्यूने भोकरमध्ये शोककळा पसरली आहे.
पांडुरंग लिंगू वाघमारे, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई वाघमारे (रा. सईदनगर भोकर), मोबाइल दुरुस्तीचे काम करणारा सय्यद अल्तमेश सय्यद अलीमोद्दीन (रा. बिलालनगर, भोकर), टाटा मॅजिकचा चालक शेख फिरोज (रा. सईदनगर, भोकर), बलवान पवार (रा. पोटा तांडा, ता. हिमायतनगर), शाहीद सौदागर (रा. भोकर), कृष्णा पवार (रा. पोटा तांडा, ता. हिमायतनगर) अशी मृतांची नावे आहेत. मात्र एका मृताची ओळख पटणे बाकी आहे. जखमींमध्ये सोमनाथ मारोती येळणे, शेख रेहान (१६, रा. भोकर), शेख जलील (६०, रा. हिमायतनगर), पिंटु धुर्वे (रा. शेखमुखवाडी नांदेड), रेखा बडगे (४०, रा. नरवट), शेख खलील शेख वहीद, शेख बाबुमिया यांचा
समावेश आहे. सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




