Rohit Pawar : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनंतर विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळाला दिला. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील भाषणात अजितदादांविषयीच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी बोलताना त्यांनी अजितदादांवरील सर्व आरोपांचे गाठोडे समुद्रात नेऊन बुडवावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच यावेळी बोलताना काकी म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या मदतीला मी कायम उभा असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दादांवर नको नको ते आरोप झाले
सभाग्रहात बोलताना, अजित पवार हे सभागृहात पहिला येणारा आणि शेवटी जाणारा नेता असायचे. चुकले तर कान पकडायचे व चांगले बोललो की स्तुती करायचे. व्यक्तिगत, बेकायदेशीर विषय घेऊन आलेल्यांचा त्यांना राग यायचा, अशी आठवण रोहित पवार यांनी काढली. दादांवर नको नको ते आरोप झाले. दादा तेव्हा अस्वस्थ व्हायचे. पण एकही आरोप सिद्ध करता आला नाही. दादा आता नाहीत, त्यामुळे ते आरोप व ते डाग आता पुसले पाहिजेत. आरोपांचे गाठोडे समुद्रात टाकले गेले तर ती त्यांना आदरांजली ठरेल, अशी मागणीही त्यांनी केली.
लोकनेता गेला, रूबाब गेला, रांगडेपणा गेला
माझे लग्न हे दादांनी ठरवले होते. पक्ष वेगळा झाला तेव्हा काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील. गेल्या काही महिन्यात आमच्या बैठका झाल्या. प्रशासनावर वचक असणारा नेता गेला. लोकनेता गेला, रूबाब गेला. रांगडेपणा गेला. राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला, अशा शब्दांत त्यांनी हळहळ व्यक्त केली.
जो लढा लढतोय, या लढ्याबद्दल…
अजितदादा मला झिपऱ्या कमी कर म्हणायचे. राजकीय वजन वाढवत जा. शारीरिक वजन कमी कर असं बोलायचे, अशी आठवण सांगताना रोहित पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर बोलताना आता मी जो लढा लढतोय, या लढ्याबद्दल दादाही मला शाबासकी देतील, असे म्हणत दादांच्या मृत्यूबद्दल आरोपींना तुरूंगात टाकल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला.
[embedded content]
शहर
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
- मान्सून अपडेट : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा!
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
महाराष्ट्र
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
- मान्सून अपडेट : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा!
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
गुन्हा
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स

























Subscribe to my channel



