जनरल डगलस मॅकआर्थर यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे– ‘जुने सैनिक कधी मरत नाहीत, ते फक्त विसरलेजातात’. गेल्या आठवड्यात एका महान माजीसेनाध्यक्षांच्या स्मृतीच्या निमित्ताने हेच वास्तव समोरआले. या सेनाध्यक्षांना मारेकऱ्यांनी आपल्या गोळ्यांचेलक्ष्य बनवले होते. दोन ‘महावीर चक्र'' (एमव्हीसी)मिळालेल्या केवळ सहा भारतीयांमध्ये त्यांचा समावेशहोता. 1965 आणि 1971 च्या युद्धात दाखवलेल्याअतुलनीय शौर्याबद्दल त्यांना हे सन्मान मिळाले होते. पुढे तेभारताचे 31 वे भूदलप्रमुख बनले आणि 31 जानेवारी1986 रोजी या पदावरून निवृत्त झाले. त्याच वर्षी पुण्यातदोन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. गेल्या 10 तारखेलात्यांची 40 वी पुण्यतिथी होती. पण कुठेही कोणतीही स्मृतीसभा झाली नाही. कोणीही त्यांचे स्मरण केले नाही. अगदीलष्कराच्या सोशल मीडिया हँडल्सवरून एक ट्विटसुद्धाझाले नाही. ते होते जनरल अरुण श्रीधर वैद्य. ‘असल उत्तर''/ खेमकरण क्षेत्रातील लढाईत वैद्य यांनी 9कॅव्हलरी (डेक्कन हॉर्स) रेजिमेंटचे नेतृत्व केले होतेपाकिस्तानी सैन्याच्या आर्मर्ड डिव्हिजनचा सफाया केलाहोता. यानंतर बसंतर, चकरा,देहिरा येथील रणगाड्यांच्यालढाईत त्यांनी 16 (इंडिपेंडंट) आर्मर्ड ब्रिगेडचे शानदारनेतृत्व केले. ‘असल उत्तर''/खेमकरणची लढाई ही याउपखंडातील सर्वात विनाशकारी व निर्णायक लढायांपैकीहोती. तेथे वैद्य यांची रेजिमेंट आघाडीवर होती. युद्धातीलअनुभवांच्या आधारे इंदिरा गांधी यांच्या सरकारने 1983मध्ये वैद्य यांना भूदलप्रमुख बनवले होते. वास्तविक पाहताले. जनरल एस. के. सिन्हा हे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ होतेआणि त्यांचीच वेळ होती. निर्णयाला राजकीय रंगही दिला गेला. जयप्रकाश नारायण यांच्याशी असलेल्याजवळीकीची शिक्षा सिन्हा यांना भोगावी लागल्याचे म्हटले गेले. त्या काळी पंजाबमधील परिस्थिती बिघडत होती. कायदा-सुव्यवस्था राखणे हे लष्कराचे काम नसतानाही सुवर्णमंदिर मुक्त करण्याची जबाबदारी वैद्य यांच्यावरआली. 1962 च्या पराभवानंतर ऑपरेशन ब्लूस्टार हीलष्करी इतिहासातील सर्वात वेदनादायी घटना मानलीजाते. कट्टरवाद्यांनी एक हिट लिस्ट तयार केली होती. यात पहिली हत्या इंदिरा गांधी यांची झाली. त्यांच्या पाठोपाठ ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्व करणाऱ्या जनरल्सचा नंबरहोता – वैद्य, कृष्णस्वामी सुंदरजी (ऑपरेशन ब्लूस्टार दरम्यानचे वेस्टर्न आर्मी कमांडर), त्यांचे चीफ ऑफस्टाफ ले. जनरल रणजीत सिंह दयाल आणि डिव्हिजन कमांडर मेजर जनरल के. एस. ‘बुलबुल'' ब्रार. या हिट लिस्टमध्ये दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची नावेही होती. पैकी ललित माकन व अर्जुन दास यांची दंगलीच्या काही महिन्यांतच हत्या झाली. यानंतर ‘खालिस्तान कमांडो फोर्स''च्या दोन मारेकऱ्यांनी बँका लुटल्या, पोलिसांचीहत्या केली. लष्कराच्या कमांडर्सच्या मागे लागले.हरजिंदर सिंह ‘जिंदा'' आणि सुखदेव सिंह ‘सुक्का'' यांनी लुधियानामध्ये (5.7 कोटी रुपयांची) बँक दरोडाटाकला. त्यानंतर त्यांनी मुंबईत डाका घातला. ते वैद्य यांनाघेरण्याचा प्रयत्न करत होते. पण गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्रपोलीस किंवा लष्कर कोणीही सतर्कता दाखवली नाही.वैद्य यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा एकच गनमॅन तैनातहोता. हल्लेखोरांनी शेजारी येऊन वैद्य यांच्या डोक्यातगोळी झाडली. मारुती कारमध्ये त्यांच्या शेजारी बसलेल्यापत्नी भानू यांनाही चार गोळ्या लागल्या. सुदैवाने त्यावाचल्या. सुक्का व जिंदा यांना नंतर पकडले. येरवडातुरुंगात खटला चालला व 1992 मध्ये त्यांना फाशी झाली. आपण ‘निर्दोष'' आहोत, कारण वैद्य याच शिक्षेस पात्रहोते, असे त्यांचे म्हणणे होते. ही बातमी आता दोनमुद्द्यांभोवती फिरते. पहिला मुद्दा असा की,जिंदा-सुक्काचा खटला चालला तेव्हा पंजाबकट्टरवाद्यांच्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात होता. सर्वसंस्था हतबल झाल्या होत्या. पंजाब सरकारचे माजी मुख्यसचिव रमेशंदर सिंग यांनी त्यांच्या ‘टर्मोइल इन पंजाब''(हार्पर कॉलिन्स, भारत, 2022) या अधिकृत पुस्तकातलिहिल्याप्रमाणे, ‘मीडिया पूर्णपणे शरण गेला होता''. जिंदाआणि सुक्का यांनी लिहिलेले 21 पानांचे पत्र 26 जुलै 1990रोजी प्रकाशित करण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्या दिवशीअनेक वृत्तपत्रांनी अंश छापले. ले. जनरल ब्रार यांच्यावरही30 सप्टेंबर 2012 रोजी लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला.त्यांनी तो हल्ला मोडून काढला. वैद्य यांच्याशी माझीपहिली भेट एका उदास सकाळी योगायोगाने झाली होती.त्याच्या आदल्या दिवशी, 19 फेब्रुवारी 1982 रोजी नागाबंडखोरांनी शीख रेजिमेंटच्या 21 व्या बटालियनच्याताफ्याला घेरून हल्ला केला होता. त्यात एका मेजरसह20 सैनिक मारले गेले होते. त्याकाळी कोलकाताहूनइंफाळची फ्लाईट गुवाहाटीमार्गे जात असे. वैद्य त्यावेळेसईस्टर्न आर्मी कमांडर होते आणि कोलकाताहून याचविमानात बसले होते. मी गुवाहाटीला पोहोचलो आणितेथून त्यांच्यासोबत विमानात चढलो. त्या घटनेमुळेचआम्ही दोघे हल्ल्याचे ठिकाण असलेल्या उखरुलमहामार्गावरील नामथिलोककडे जात होतो. उदास असलेल्या जनरलचे मन हलके करण्यासाठी मीसहानुभूती व्यक्त केली आणि सैनिकांच्या मृत्यूवर दुः खव्यक्त केले. त्यावर वैद्य यांनी उत्तर दिले होते: "तुम्हालाआमचा पेशा समजणार नाही. लोक मारले जातात . हृदयकमकुवत आहे ते सैनिक बनू शकत नाहीत.’ वैद्ययांच्यासोबत झालेल्या संभाषणातील दोन गोष्टी मलास्पष्ट आठवतात. पहिली गोष्ट म्हणजे देशवासियांचासामना करताना निर्माण होणारी द्विधा मनःस्थिती. त्यांचेमत अगदी स्पष्ट होते : "देशाच्या कायदेशीर निवडूनआलेल्या सरकारविरोधात कोणी शस्त्र उचलल्यासत्याला देशद्रोहीच म्हटले जाईल. आमची शत्रूची व्याख्याहीच आहे.’ वैद्य यांना जिवाला धोका असल्याचा इशाराअनेकदा देण्यात आला होता. त्यावर त्यांचेतत्वज्ञानासारखे उत्तर असायचे : "मी दोन युद्धे लढलोआणि सुरक्षित बाहेर आलो. एखाद्या गोळीवर माझे नावलिहिले असेल, तर ती मला शोधून काढेलच." 10ऑगस्ट 1986 रोजी नेमके हेच घडले. वैद्य यांना आपणविसरून गेलो. आपल्या सर्व माजी सैनिकांना, महानयुद्धवीरांना तसेच विसरून जायचे का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्वकर्तेकायदा - सुव्यवस्था राखणे हे लष्कराचेकाम नव्हते. तरी सुवर्णमंदिर मुक्तकरण्याची जबाबदारी वैद्य यांच्याखांद्यावर आली. ऑपरेशन ब्लूस्टार हीलष्कराच्या इतिहासातील वेदनादायीघटना आहे. कट्टरवाद्यांनी ‘हिट लिस्ट''तयार केली होती. त्यात पहिली हत्याइंदिरा गांधी व नंतर ऑपरेशनचे नेतृत्वकरणाऱ्या जनरल्सचा नंबर होता.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
महाराष्ट्र
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

रस्ता रुंदीकरणावरून शाही मशिदीवर कारवाई; विरोधात मोठी गर्दी, प्रशासनावर दगडफेकीचा दावा
‘Golden GUYS’ सनी वाकचौरेच्या Mercedesवर पोलिसांची कारवाई! 🚔🚘⚠️
पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे वाळलं; शेतकऱ्याने ३ एकर पिकावर फिरवला ट्रॅक्टर!
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल



























Subscribe to my channel




