मेघना पंत यांचा कॉलम:मुलांमध्येही क्रूरता वाढू लागली, तर आपल्या उज्ज्वल भविष्याचे काय?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎काही व्हिडिओ असे असतात, जे पाहिल्यानंतर वाटते की‎आपण ते पाहिलेच नसते तर बरे झाले असते. ते व्हिडिओ‎भयानक असतात म्हणून नाही, तर ते एक अस्वस्थ करणारे‎सत्य उघड करतात म्हणून. ते सत्य म्हणजे, आपण क्रूरतेला‎किती सहजपणे सामान्य मानू लागलो आहोत.‎ एका गरीब, निष्पाप, सहा वर्षांच्या चिमुरडीवर- जी‎दिव्यांगही होती. आठ वर्षांच्या मुलाने केलेला हल्ला ही‎अशीच एक भयावह घटना आहे. या घटनेने संपूर्ण देशाला‎हादरवून सोडले. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.‎पंचकुलातील त्या शाळेत देखरेखीची व्यवस्था कशी होती?‎तिथे त्या मुलीवर इतक्या निर्भयपणे हल्ला कसा होऊ‎शकला? शिक्षक कुठे होते? आपण आपल्या मुलांना‎संवेदनशीलता, आक्रमकता आणि दुसऱ्या माणसाच्या‎जिवाचे महत्त्व याबद्दल काय शिकवत आहोत?‎ आपल्याला हे अस्वस्थ करणारे प्रश्न विचारावेच‎लागतील. विशेषतः यासाठी कारण, गुन्हा करणारा स्वतःही‎अजून एक लहान मुलगाच आहे. शेवटी या मुलाने आपल्या‎घरात काय पाहिले आहे? शाळेत काय पाहिले आहे?‎समाजात काय पाहिले आहे? मीडिया आणि सोशल‎मीडियावर काय पाहिले आहे? तो कशा प्रकारच्या‎वागणुकीच्या संपर्कात आला आहे? हिंसा, संमती, करुणा‎आणि आपल्या कृत्यांच्या परिणामांबद्दल त्याची समज कशी‎घडवली जात आहे? मुले आपोआप मोठी होत नाहीत.‎त्यांच्या वागणुकीवर त्यांचा परिसर, अनुभव आणि त्यांच्या‎संगोपनाचा प्रभाव पडत असतो.‎ यानंतर बाल-न्यायाचा आणखी एक कठीण प्रश्न समोर‎येतो. कायदा मानतो की मुले प्रौढांपेक्षा वेगळी असतात.‎आणि बाल-न्यायव्यवस्थेत त्यांच्या पुनर्वसनाला मध्यवर्ती‎महत्त्व मिळायला हवे. पण पुनर्वसनाचा अर्थ उदासीनता‎असा होऊ शकत नाही. तसेच याचा अर्थ असाही होऊ‎शकत नाही की पीडितेच्या वेदनांना दुय्यम मानले जावे.‎ जर कोणी आठव्या वर्षी एवढा भयंकर गुन्हा करू‎शकतो, तर तो मोठा झाल्यावर काय करेल? केवळ आपली‎न्यायव्यवस्था त्यांना अल्पवयीन समजते, म्हणून मनोरुग्ण‎प्रवृत्ती असलेल्यांच्या कृत्यांना सहन केले जाऊ शकत नाही.‎या प्रकरणात कायदा आणि नैतिकतेच्या कक्षेत जबाबदारी‎निश्चित व्हायला हवी. त्यांचे मानसिक मूल्यमापन केले‎जावे आणि गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार शिक्षा मिळायला हवी.‎व्यवस्थेला एक कठोर संदेश द्यावा लागेल की जर तुम्ही‎गुन्हा कराल, तर त्याची शिक्षाही भोगावी लागेल. जेणेकरून‎कोणत्याही मुलाने पुन्हा असे करण्याचे धाडस करू नये.‎ या घटनेचा सर्वात निराशाजनक पैलू तो आहे, जो सोशल‎मीडियावरील प्रतिक्रियांमध्ये दिसत आहे. लोक यात‎राजकारण ओढत आहेत. या हिंसेचा संबंध पीडित मुलीच्या‎सामुदायिक ओळखीशी आहे, असे काही लोक धार्मिक‎संदर्भांद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका सहा‎वर्षांच्या चिमुरडीचा जीव जाता जाता वाचला आहे. आणि‎आपली पहिली प्रतिक्रिया तिच्या वेदनांना आपल्या राजकीय‎पूर्वग्रहांसाठी हत्यार बनवण्याची असते? हा एका खूप‎मोठ्या अपयशाला सामोरे जाण्याचा प्रश्न आहे.‎संवेदनशीलता शिकवण्यात आलेले अपयश, मुलांवर‎देखरेख ठेवण्यात आलेले अपयश. तसेच क्रूरतेला कधीही‎सामान्य बनू देऊ नये, हे ओळखण्यात आलेले अपयश.‎आपण वारंवार म्हणतो की मुले हे भविष्य आहेत, पण जर‎आपण वर्तमानातच त्यांची सुरक्षा निश्चित करू शकत‎नाही, तर आपण कसे भविष्य घडवत आहोत?‎ एका सहा वर्षांच्या मुलीला खेळणी, शाळा आणि‎वाढदिवसाला मिळणाऱ्या भेटवस्तूंची चिंता असायला हवी.‎दुसरा एखादा मुलगा आपला जीव घेण्याचा प्रयत्न करणार‎तर नाही ना? याची चिंता तिला नसावी!‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *