
Pune : पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय; तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांच्या नावाने करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या नामकरणानंतर संबंधित संकेतस्थळे, अभिलेखे, नोंदवही, फलक, अधिकृत पत्रव्यवहार व इतर कागदपत्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबईचे आयुक्त; तसेच संबंधित संस्थांचे अधिष्ठाता यांच्यावर सोपवली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या तीन जानेवारी २०१३च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर २० जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयही सुरू करण्यात आले.
यापूर्वी ३१ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती’ असे केले होते. ते आता बदलून अजित पवार यांचे नाव त्यास दिले जाईल. या नव्या निर्णयाने वाद निर्माण होण्याची शक्यता असून काही संघटनांकडून नाव बदलण्याच्या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला आहे.
संशोधन केंद्राचेही बदलले नाव
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरण ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे करण्यास मान्यता दिल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले. देशी गायींचे संगोपन व संवर्धन; तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी हे केंद्र कार्यरत आहे.
‘अजितदादांच्या संकल्पनेतून या केंद्राची स्थापना झाली होती. या केंद्राच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडे निधीची शिफारस करण्यात आली असून, ५६ कोटी रुपये उपलब्ध होतील,’ असे भरणे यांनी सांगितले.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




