फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे भारतात स्वागत करत फ्रान्सचा उल्लेख युरोपचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून केला. PM मोदींनी 2026 हे वर्ष भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे असं म्हणत दिवसांपूर्वी युरोपियन युनियनने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. यानंतर भारत आणि फ्रान्समधील संबंध आणखी दृढ झाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मॅक्रॉन यांनी यावेळी दोन्ही देशांमध्ये मोठे करार झाल्याची माहिती दिली.
फ्रान्स हा भारताचा जुना सहकारी – पंतप्रधान मोदी
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मिळून आम्ही या धोरणात्मक भागीदारीला अभूतपूर्व खोली आणि ऊर्जा दिली आहे. आम्ही आमच्या धोरणात्मक भागीदारीचे रूपांतर लोकांच्या भागीदारीत करत आहोत. आम्ही स्टार्टअप्स आणि एमएसएमई दरम्यान एक मजबूत नेटवर्क तयार करण्यावर भर देत आहोत. आम्ही महत्त्वपूर्ण खनिजे, जैवतंत्रज्ञान आणि प्रगत साहित्यांमध्ये एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत.
शांततेला आमचा पाठिंबा – मोदी
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय आणि हेल्थ इंडो सेंटर फॉर डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी सुरू करत आहोत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, युक्रेन असो, पश्चिम आशिया असो किंवा इंडो-पॅसिफिक असो, आम्ही प्रत्येक प्रदेशात शांततेसाठीच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो. तसेच दहशतवादाचे उच्चाटन करणे ही आमची सामायिक वचनबद्धता आहे. आम्ही लवकरच फ्रान्समध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र उघडणार आहोत. आम्ही आमच्या संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करत आहोत.
दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार – मॅक्रॉन
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यावेळी म्हटले की, भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध आणखी मजबूत करण्यावर आमचा भर असणार आहे. एआय आणि ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचे करार झालेले आहेत. तसेच राफेल, पाणबुडी आणि हेलिकॉप्टरसंबंधी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत अशी माहितीही मॅक्रॉन यांनी दिली आहे.
[embedded content]
शहर
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई! ६३ लाख बोगस शिधापत्रिका (Ration Cards) रद्द होणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा.
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
महाराष्ट्र
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
गुन्हा
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.






















Subscribe to my channel




